शिखर धवन जिममध्ये घेतोय तुफान मेहनत, ‘म्हणतोय माझा घाम हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो’

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा ओपनर शिखर धवन आगामी श्रीलंका दौऱ्यात टीमचे नेतृत्त्व करणार आहे. यामुळे त्याच्याकडून सर्व भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या दौऱ्याची तयारी भारतीय संघ करत आहे.

या कालावधीमध्ये धवन त्याच्या फिटनेसवर जोरदार मेहनत घेत आहे. धवनने सोशल मीडियावर त्याचा एक टॉपलेस फोटो अपलोड केलाय. तो फोटो पाहून सध्या साऊथम्पटनमध्ये असलेला धवनचा ओपनिंग पार्टनर रोहित शर्मा प्रभावित झाला आहे.

या फोटोला ‘माझा घाम हिऱ्यापेक्षा जास्त चमकतो’, असे कॅप्शन धवनने दिले आहे. धवनच्या यो फोटोने क्रिकेटपटूंसह अभिन्यांनाही प्रभावित केले आहे. यामुळे हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

यावर रोहित शर्माने ‘ओ की गल’ म्हणजेच क्या बात है! अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश रैनाने आगीचा इमोजी पोस्ट केला आहे. तर अभिनेता मुजमिल इब्राहिमने धवनकडे फिटनेस टीप्सची मागणी केली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुढील महिन्यात तीन वन-डे आणि तीन टी 20 सामन्यांची ही मालिका होणार आहे. धवनच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या टीममध्ये अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेली टीम सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटईन आहे.

आता या नवीन संघाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राहुल द्रविड हा देखील टीमचा कोच असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. कोरोनामुळे आयपीएल रद्द करण्यात आली. यानंतर हा पहिलाच दौरा आहे.

ताज्या बातम्या

तुम्हाला कधीच कोणी विसरु शकणार नाही; मिल्खा सिंग यांच्या आठवणीत विराट कोहली झाला भावूक

गाडी चालवताना शारीरिक संबंध ठेवत होता ड्रायव्हर, पुढे काय झाले वाचा….

‘ती चूक मी का केली?’ मिल्खा सिंग यांच्याबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.