पगार घेणाऱ्या जवानांना शहीद म्हणणे अयोग्य, वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर लेखिकेला ठोकल्या बेड्या

लेखिकेच्या वादग्रस्त पोस्टनंतर तिला अटक करण्यात आली आहे. शिखा सरमा असे त्यांचे नाव आहे. त्यांचे वय ४८ वर्षे आहे. त्यांनी फेसबूकला जवानांबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. पगार घेणारा नोकरदार जर त्याच्या कर्तव्यावर असताना मरण पावत असेल तर त्याला शहीदाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही अशी वादग्रस्त पोस्ट त्यांनी केली होती.

त्यानंतर आसाममधील शिखा सरमा यांना देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. शिखा यांच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर आजच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

ही माहिती गुवाहाटीचे पोलिस आयुक्त मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी दिली आहे. शिखा सरमा या सोशल मिडीयावर प्रचंड ऍक्टीव्ह असतात. त्या काहीना काही आपली मते मांडत असतात. छत्तीसगढमध्ये भारताचे जवान शहीद झाल्यानंतरही त्यांनी आपले विचार मांडले होते पण त्यामुळे त्या अडचणीत आल्या.

त्यांनी पोस्ट केली होती की, जो नोकरदार पगार घेतो तो त्याच्या कर्तव्यावर असताना मरण पावला तर त्याला शहीद मानता येणार नाही. हाच न्याय जर लावायचा ठरला तर वीज मंडळाचे जे कर्मचारी नोकरीवर असताना विजेचा धक्का लागून मरण पावतात त्यांनाही शहीदाचा दर्जा मिळायला हवा असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

त्यांच्या या पोस्टनंतर खुप संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या आणि दोन पत्रकारांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. हा आपल्या सैनिकांचा घोर अपमान असून त्यांच्या बलिदानाची तुलना पैशांची केली जात असल्याचे त्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

महत्वाच्या बातम्या
तुमने अपनोंको भुला दिया! सलूनमधले गाणे ऐकताच त्याला कोसळले रडू, पहा व्हायरल व्हिडीओ
अनिल परब यांच्यावरील आरोपांचे धागेदोरे थेट ठाकरे कुटुंबापर्यंत
‘त्या’ कोब्रा कमांडोचा अपहरणानंतरचा पहिला फोटो आला समोर, कमांडोला सोडण्यासाठी ठेवली ‘ही’ अट
इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नाअवस्थेत उभ्या होत्या महिला; पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.