राज कुंद्रा माझ्या घरी आला आणि मला किस करू लागला, मी बाथरूममध्ये…; शर्लिन चोप्राच्या खुलाश्याने खळबळ

मुंबई पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. १४०० ते १५०० पानांच्या या आरोपपत्रात शिल्पा शेट्टी आणि शर्लिन चोप्रा यांच्यासह एकूण ४२ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात शर्लिन चोप्राच्या वक्तव्याचा उल्लेख आहे, जो तिने मुंबई गुन्हे शाखेसमोर नोंदवला. शर्लिनने तिच्या निवेदनात म्हटले होते की, राज कुंद्रा यांनी तिला हॉटशॉट्स अॅपसाठी केअरफ्री होऊन काम करण्यास सांगितले होते.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार शर्लिनने सांगितले की, तिने द शर्लिन चोप्रा नावाचे अॅप बनवण्यासाठी आर्म्सप्राईम मीडिया लिमिटेड नावाच्या फर्मशी करार केला आहे. तेव्हा सौरभ कुशवाह आणि राज कुंद्रा हे आर्म्सप्राईमचे डायरेक्टर होते. त्या अॅपच्या निर्मितीनंतर शर्लिन चोप्राचे फोटो आणि व्हिडिओ त्या अॅप्लिकेशनवर टाकले जाऊ लागले.

आर्म्सप्राईमशी झालेल्या करारानुसार, शर्लिन चोप्राला त्या अॅपमधून येणाऱ्या उत्पन्नाच्या ५० टक्के मिळणार होते. पण तिला ५० टक्के रक्कम कधीच मिळाली नाही. यानंतर राज कुंद्राने शर्लिन चोप्राशी हॉटशॉट्स अॅपसाठी काम करण्यासाठी संपर्क साधला. ते अॅप आर्म्सप्राईम मीडिया लिमिटेडचाही एक भाग होता. हॉट हॉटशॉटसाठी शर्लिनशी संपर्क साधताना राज म्हणाले, हॉटशॉट्स अॅपची कंटेंट ‘हॉट आणि बोल्ड’ असेल. त्यामुळे शर्लिनला केअरफ्री म्हणून काम करावे लागेल.

पण शर्लिन आणि राज कुंद्रा यांच्यात मिळणाऱ्या रक्कमेचा गोंधळ होता. म्हणूनच शर्लिन चोप्राने हॉटशॉट्स अॅपसाठी काम करण्यास नकार दिला. हॉटशॉट अॅप्लिकेशन राज कुंद्राचे होते. माझा नकार असूनही राज कुंद्रा आणि त्यांच्या फर्मची क्रिएटिव्ह डायरेक्टर मीता झुनझुनवाला यांनी माझ्याशी वारंवार संपर्क ठेवला. आणि तो मला सतत त्यांच्यासाठी काम करायला सांगत असे, असे शर्लिन चोप्राने सांगितले आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राने त्याच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोपही केला होता. शर्लिनने सांगितले की २०१९ मध्ये तिच्या व्यवसाय व्यवस्थापकाला राज कुंद्राचा फोन आला. त्याला एका प्रस्तावावर चर्चा करायची होती. यासंबंधी एक बैठक २७ मार्च २०१९ रोजी ठरवण्यात आली होती.

या बैठकीनंतर राज आणि शर्लिन यांच्यात कंटेंटवरुन वाद झाला. त्यानंतर राज काहीही न सांगता त्याच्या घरी गेला. शर्लिनने नकार देऊनही त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न सुरू केला. शर्लिन सांगते की तिने राजला स्पष्टपणे सांगितले की तिला ना कोणत्याही विवाहित पुरुषाशी संबंध ठेवायचा आहे,

ना तिला व्यवसाय आणि वैयक्तिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. तेव्हा राजने तिला सांगितले की त्याची पत्नी शिल्पा शेट्टीसोबतचे संबंध गुंतागुंतीचे आहेत. म्हणूनच ते घरी खूप अस्वस्थ राहतात. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राजला रोखण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तो थांबला नाही, तेव्हा तिने त्याला ढकलले आणि स्वतःला बाथरूममध्ये बंद केले. असे शर्लिनने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् राज्यपालांनी व्यासपीठावरच ओढला महिलेच्या तोंडावरील मास्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
…आणि शेतात राबणारा शेतकरी IPS झाला! वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे महिला संतापल्या; छेड काढणाऱ्याला खांबाला बांधून काठीनं धुतला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.