कारगीलमध्ये आपल्या १८ वर्षाच्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता एकटीने एअर स्टेशन सांभाळनारी विरांगणा

 

नवी दिल्ली | २६ जुलै १९९९ च्या पाकिस्तानला भारताने जोरदार लढा देऊन कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला होता. कारगिलच्या उंच टेकड्यांवर होणाऱ्या या युद्धात भारताच्या लष्करासमोर पाकिस्तानच्या सैनिकांनी शेवटी गुडघे टेकले होते.

या कारगिल युद्धात भारताच्या काही जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोलाची कामगिरी बजावली आहे. असे एक नाव शेरिंग अंग्मो शुनु यांचे आहे. जेव्हा कारगिल युद्ध सुरू होते तेव्हा कारगिलच्या AIR (ऑल इंडिया रेडिओ) स्टेशनमध्ये काही पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. तेव्हा शेरिंग अंग्मो शुनु यांनी एकट्याने त्या शत्रूंना लढा दिला होता.

कारगिल युद्ध सुरू असताना एका संध्याकाळी कारगिलच्या AIR स्टेशनमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला होता. त्यामुळे तिथल्या सर्व इंजिनिअरांनी पळ काढला. पण त्यांचे प्रसारण करण्याची वेळ ही संध्याकाळी ५ वाजेची होती.

तिथे असणारी महिला कर्मचारी म्हणजेच लेह आणि कारगिल स्टेशन डायरेक्टर शेरिंग अंग्मो शुनु यांनी धडपड करत बिग्रेड कारगिल कमांडर यांच्याकडून मदत मागितली. त्यानंतर कारगिल AIR स्टेशनवर काही जवानांना शेरिंग अंग्मो शुनु यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. तेव्हा संध्याकाळी ५ वाजता AIR चे प्रसारण सुरू करण्यात आले.

कारगिलच्या युद्धात कारगिलच्या AIR स्टेशनने महत्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जवानांच्या आणि भारताच्या लढाऊ हेलिकॉप्टरांना संपवण्यात आल्याच्या खोट्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात होत्या ते थांबवण्याचे काम AIR कडून करण्यात आले.

एवढेच नाही तर शेरिंग अंग्मो शुनु यांनी भारतीय जवान कारगिल युद्धात लढत असताना त्यांना धैर्य देण्याचे कामही रेडिओ स्टेशनवरून केले.

भारतीय सैनिकांना कुठे मदत लागत असेल तर त्यांचा संदेश  दुसऱ्या जवनांपर्यंत पोहचवण्याचे कामही शेरिंग अंग्मो शुनु यांनी रेडिओ स्टेशनवरून केले. एवढेच नाही तर भारतीय जवांनांना मदतीची गरज असेल त्यामुळे आपल्या १८ वर्षाच्या मुलालाही सैनिकांची मदत करण्यासाठी  शेरिंग अंग्मो शुनु यांनी पाठवले होते.

कारगिल युद्धाच्या काळात सैनिकांना जेवण आणि गोळा बारुद पोहचवण्यासाठी कोणीही हमाल कामगार तिथे उपलब्ध  नव्हते.  तेव्हाही शेरिंग अंग्मो शुनु यांनी जवानांच्या मदतीसाठी हात पुढे केला. शेरिंग अंग्मो शुनु यांनी तेव्हा रोज प्रसारण करताना भारतीय जवान आपल्यासाठी लढत आहे.त्यांची मदत आपण केली पाहिजे, असे आवाहन लडाखी तरुणांना त्या करत होत्या. त्यामुळे भारतीय जवानांनाही याची मोठी मदत मिळत होती.

शेरिंग अंग्मो शुनु या गोळीबार सुरू असतानाही कारगिल रेडिओ स्टेशन सांभाळत होत्या. एवढेच नाही तर स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या १८ वर्षाचा मुलगा रिकीलाही सैनिकांची मदत करण्यासाठी पाठवले होते.

शेरिंग अंग्मो शुनु यांनी आपल्या मुलाला पाठवल्यानंतर तिथल्या काही स्थानिक तरुण देखील शेरिंग अंग्मो शुनु यांची साथ देत स्वयंसेवक म्हणून जवानांची मदत करण्यासाठी उतरले. सुरवातीला २०० तर नंतर ८०० तरुण जवानांच्या मदतीसाठी एकत्र आले.

कारगिलचे युद्ध सुरू असताना रेडिओ स्टेशनवर बॉम्ब टाकले जायचे तरीही शेरिंग अंग्मो शुनु मागे नाही सरकल्या.त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. अनेकदा काही तांत्रिक अडचणी आल्याने त्या टेक्निशियनची मदत  घेण्याचा प्रयत्न करायच्या तेव्हा त्यांना टेक्निशियन मदत करणे टाळायचे. दिल्लीच्या जनतेनेही त्यांना तिथून पळून जाण्यास सांगितले तरीही त्या तिथे आपल्या कर्तव्य पार पाडत होत्या, त्यानंतर युद्ध समाप्त होई पर्यंत त्यांनी आपली कामगिरी अशीच बजावली.

 

महत्वाच्या बातम्या-

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या न्युज चॅनेल्स विरोधात बजाज मैदानात; पारलेनेही घेतला मोठा निर्णय

अर्णबचा पाय खोलात! बॉलीवूडमधील बड्या स्टार्सने खेचले कोर्टात; लावले ‘हे’ गंभीर आरोप

आजपासून सरकार देत आहे डिस्काऊंटवर सोने, ‘या’ किंमतीत मिळणार सोने

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.