८० वर्षे वय असतानाही शिवरायांच्या दर्शनासाठी रायगडावर पायी येणाऱ्या शेलार मामांचे निधन, संभाजीराजे भावूक

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरचे शिरोली गावचे दत्तू विठू पाटील म्हणजेच शेलार मामा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.

पुर्ण महाराष्ट्रात दत्तू पाटील यांना शेलार मामा म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे इतके वय असतानाही दरवर्षी रायगडावर पायी यायचे. रागडावर माझे महाराज बसलेले आहे, त्यांना भेटायला मी जाणारच असे ते नेहमी म्हणायचे. दत्तू पाटील यांच्या जाण्याने खासदार संभाजीराजेही भावूक झाले आहे. त्यानंतर त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

संभाजीराजे यांची फेसबूक पोस्ट-
कोल्हापूर मधील शिरोली गावचे श्री दत्तू विठू पाटील (बापू) पूर्ण महाराष्ट्राला ‘शेलार मामा’ म्हणून परिचित होते. वय वर्षे ८० असताना सुध्दा शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी ते रायगडला पायी येत असत.

ते नेहमी म्हणायचे की,”रायगडावर माझे महाराज बसले आहेत आणि त्यांना भेटायला मी जाणारच.” शिवकालीन युद्धकलेचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि संपूर्ण आयुष्यभर जपला. आज त्यांचे दुःखद निधन झाले.

माझ्यावर व छत्रपती घराण्यावर निस्सीम प्रेम करणारा एक रांगडा शिवभक्त कालवश झाला. अंतिम समयी त्यांच्या तोंडी एकच वाक्य होते ; माझ्या राजांचा, संभाजीराजेंचा फोटो मला दाखवा.

त्यांच्या मुलाकडून ही गोष्ट ऐकताना मला गहिवरून आलं. अंतिम श्वासातदेखील छत्रपती घराण्यावर असलेलं प्रेम, निष्ठा आणि विश्वास यातून व्यक्त होत होता. प्रत्येक शिवकार्यात तल्लीन होणाऱ्या या शिवभक्तास भावपूर्ण श्रध्दांजली !

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या मागे ईडी लागतेय, भाजपचे सर्व नेते काय धुतलेल्या तांदळासारखे आहेत काय?
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिहून अटकेचे चॅलेंज देणाऱ्याला चोप चोप चोपले
पाकिस्तानपेक्षा जास्त सुरक्षित कोणतीच जागा नाही, म्हणणाऱ्या वसीम अक्रमच्या पत्नीला पाकिस्तानी लोकांनीच झोडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.