शेखर सुमनचा मोठा खुलासा; सुशांतने महिन्याभरात बदलले होते ५० सिमकार्ड्स

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला बरेच दिवस उलटून गेले पण त्याने आत्महत्या का केली ? याचे ठोस कारण अजूनपर्यंत समजलेले नाही. याबाबत अनेक पुरावे समोर येत आहेत.

अभिनेता शेखर सुमन याने म्हंटले आहे की, हे प्रकरण जेवढं डोळ्यांनी दिसतंय तेवढं सरळ नाहीये. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा. अशी मागणी त्याने केली आहे.

सुशांतला न्याय मिळवून द्यायची मोहीम त्याने हाती घेतली आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना शेखर सुमन यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांतने आत्महत्येच्या आधी सुसाईड नोट लिहिली नाही. घराची बनावट चावी सापडत नाहीये. त्याने महिन्याभरात ५० वेळा सिमकार्ड्स बदलले आहेत. हे मला साधेसुदे प्रकरण नाही वाटत असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

सुशांतने जरी आत्महत्या केली असली तरी सुशांतने ज्यांच्यामुळे आत्महत्या केली त्यांना सजा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीवरून वाद निर्माण झाला आहे.

पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करण्याचे शेखर सुमन यांनी टाळले. आणि या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मी आणि शाहरुख खान सोडून सुशांतच असा एकमेव अभिनेता होता ज्याने टिव्हीपासून सुरुवात करून मोठ्या पडद्यावर यश मिळवले कदाचित ही गोष्ट काहींच्या डोळ्यात खुपली असेल असेही ते यावेळी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.