बॉलीवूडला जादूची नगरी बोलतात. कारण तिथे कधी काय होईल आणि कधी कोणाचे नशीब बदलेल काही सांगता येत नाही. या गोष्टींमूळेच बॉलीवूडकडे अनेक लोकं आकर्षित होत असतात. रोज अनेक युवक फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव करण्यासाठी येतात.
लहान असताना अनेक मुलांना चित्रपट पहायला आवडतात. चित्रपट पाहिल्यामुळे त्या मुलांना अभिनेता बनण्याची आवड निर्माण होती. अशाच एका कालाकाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यांनी सुरुवातीला बी ग्रेड चित्रपट केले. पण नंतर मात्र ते इंडियन टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग झाले.
या कलाकाराला मोठ्या पद्यावर राज्य करायचे होते. पण या कलाकाराने छोट्या पद्यावर राज्य केले आणि ते झाले टेलिव्हिजनवरील पहिले सुपरस्टार. या अभिनेत्याचे नाव आहे शेखर सुमन. शेखर सुमनला टेलिव्हिजनवरचे सुपरस्टार समजले जाते.
शेखर सुमनचे स्वप्न होते की, त्यांनी बॉलीवूडमध्ये काम करावे. त्यांचे हे स्वप्न पुर्ण देखील झाले. पण जास्त काळ टिकू शकले नाही. खुपच कमी वेळात त्यांचे हे स्वप्न तुटले आणि त्यांना टेलिव्हिजन काम करावे लागले. जाणून घेऊया असे काय झाले ज्यामुळे शेखर सुमनने बॉलीवूडमध्ये काम करणे बंद केले.
शेखर सुमन यांचे खरे नाव मंजूनाथ शेखर सुमन आहे. त्यांचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबाचे बॉलीवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही नाते नव्हते. पण शेखर सुमन यांना मात्र चित्रपटांमध्ये रुची होती. म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
शेखर सुमन लहान होते. तेव्हा अनेक वेळा घरच्यांपासून लपून चित्रपट पहायचे. म्हणून त्यांना अभिनयात रुची निर्माण झाली होती. अनेक वेळा ते आरश्यासमोर उभे राहून चित्रपटातील डायलॉग्स बोलायचे आणि हिरोप्रमाणे अभिनय करायचे.
एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना हे सगळं काही करताना पाहिले. त्यांच्या वडिलांना फिल्म इंडस्ट्री आवडत नव्हती. म्हणून त्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलाने अभिनय क्षेत्रापासून खुप लांब राहावे. पण शेखर सुमन मात्र ऐकायला तयारी नव्हते.
म्हणून शेवटी कंटाळून त्यांच्या वडिलांनी त्यांना एका बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. त्यांच्या शाळेचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेजमधून अभिनयात डिग्री घेतली. शेखर सुमनने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीराम कॉलेजमध्ये त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला. कॉलेजमधल्या एका कार्यक्रमासाठी शम्मी आंटी आल्या होत्या. शम्मी जुन्या अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांध्ये काम केले आहे. त्यासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रात देखील काम केले आहे.
त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्यांची गरज होती. त्यांनी श्रीराम कॉलेजमध्ये कोणाला चित्रपटात काम करायचे आहे का? असे विचारले. त्यावर शेखर सुमनने देखील होकार दिला. हा चित्रपट होता ‘पिघलता आसमान’ यात शेखर सुमनचा रोल छोटासा होता. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत झाले.
या चित्रपटापासूनच त्यांना बॉलीवूडमध्ये आवड निर्माण झाली. त्यामूळे त्यांनी मुंबईला राहायला यायचे ठरवले. २२ वर्षांचे असताना त्यांनी अलकासोबत लग्न केले आणि मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला परत आल्यानंतर ते शम्मी आंटीला भेटायला गेले. त्यावेळेस त्यांनी शेखर सुमन आणि शशी कपूर यांची भेट करुन दिली.
शशी कपूरने त्यांची निवड ‘उत्सव’ चित्रपटासाठी केली. या चित्रपटात त्यांनी रेखासोबत काम केले होते. हा चित्रपट बी ग्रेड होता. रेखाला भेटण्यासाठी त्यांनी तीन दिवस वाट बघितली होती. त्यानंतर त्यांना या चित्रपटात घेण्यात आले. या चित्रपटात रेखा आणि शेखर सुमनमध्ये अनेक इंटिमेट सीन्स होते.
ह्या नंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले. पहिल्याचं चित्रपटाने शेखर सुमनला इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यासोबतच त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर सुरु झाल्या. पण शेखर सुमनची इच्छा होती, की उत्सव हाच त्यांचा पहीला चित्रपट असावा.
दुसरीकडे उत्सव या चित्रपटाला उशीर होत होता. कधी आर्थिक अडचणी तर कधी तांत्रिक अडचणी येत होत्या. याच वेळेत शशी कपूरच्या पत्नी जेनीफर यांचे निधन झाले. या सर्व कारणामूळे या चित्रपटाला तीन वर्ष उशीर झाला. या सर्व गोष्टींमूळे शेखर सुमन यांच्या करीयरमधले तीन वर्ष वाया गेले.
ही त्यांची सर्वात मोठी चुक झाली. त्यामुळे त्यांना नंतर चित्रपटांच्या ऑफर मिळणे बंद झाले होते. दुसरीकडे शेखर सुमन यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना एक मुलगा झाला होता. त्यांनी त्याचे नाव आयूष ठेवले. या काळात त्यांनी ‘नाचे मयूरी’ आणि ‘पती परमेश्वर’ या चित्रपटांमध्ये काम केले.
त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. पण त्यांचे चित्रपट फ्लॉप होत होत. त्यांनी अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यानंतर ते काही दिवस फिल्म इंडस्ट्रीपासून लांब होते. याच काळात त्यांचा मोठा मुलगा आयूषला एका आजाराने घेरले. त्यामूळे ते पुर्णपणे तुटून गेले.
त्यांच्या मोठ्या मुलाचे आजारामुळे निधन झाले होते. या एका गोष्टीमूळे शेखर सुमनचे सगळे आयुष्य बदलून गेले होते. त्यांना काम करण्याची इच्छा नव्हती. त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा छोटा मुलगा होता. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
अशा परिस्थितीत त्यांचे त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पैशांची आवश्यकता होती म्हणून त्यांनी टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली. त्यांना टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ‘देख भाई देख शो’ या शोपासून त्यांचा टेलिव्हिजनवरचा प्रवास सुरु केला.
त्यांना छोट्या पडद्यावर चांगलेच यश मिळाले. या कार्यक्रमानंतर शेखर सुमन यांनी टेलिव्हिजनवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वा जनाब, रिपोर्टर, छोटी बहू, अंदाज, कभी इधर कभी उधर असे अनेक शो केले. त्यांना ज्या प्रसिद्धीची आशा होती. ती सर्व त्यांना छोट्या पडद्यावर मिळाली. टेलिव्हिजनने त्यांना प्रसिद्धी, पैसा सगळेकाही दिले.
टेलिव्हिजनवर या काळात स्टँड अप कॉमेडीचा ट्रेंड सुरु झाला होता. पण शेखर यांनी न घाबरता अनेक प्रयोग करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी मूव्हर्स अँड स्नेकेर्स, सिम्प्लि शेखर, कॅरी ऑन शेखर, पोल खोल असे अनेक शो केले. हे सर्व शो सुपरहीट ठरले. या कार्यक्रमांनी शेखर सुमनला टेलिव्हिजनवरचा सुपरस्टार बनवले होते.
शेखर सुमनने या काळात टिव्हीवर दोन हजारपेक्षा जास्त कलाकारांच्या मुलाखती घेऊन नवीन रेकॉर्ड तयार केले. एवढेच नाहीतर ‘इंडीया टुडे मॅगझिन’ने शेखर सुमनची मुलाखत घेतली. आत्तापर्यंत ही मॅगझिन फक्त मोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेत होती. शेखर सुमन हे टेलिव्हिजनवरचे पहीले कलाकार होते जे या मॅगझिनमध्ये झळकले होते.
२००८ मध्ये शेखर सुमन यांचा मुलगा अध्यनने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. महेश भट्ट यांनी अध्यनला त्यांच्या ‘राझ’ चित्रपटाच्या सीरीजमध्ये काम करण्याची संधी दिली. २००९ मध्ये शेखर सुमन यांनी राजकारणात प्रवेश केला. पण राजकारणात त्यांचा पराभव झाला.
त्यांनी हार न मानता टेलिव्हिजनवर कम बॅक केले. त्यांनी या काळात टिव्हीवर कॉमेडी शोमध्ये जज म्हणून काम केले. आजही भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहास शेखर सुमनसारखी प्रसिद्धी कोणत्याही कलाकाराला मिळालेली नाही. त्यांचे कार्यक्रम आजही अनेकांचे मनोरंजन करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
८० च्या दशकात लग्न न करता आई झाली होती ‘ही’ अभिनेत्री; आज मुलगी आहे प्रसिद्ध डिझायनर
मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ‘ही’ ऑफर
विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा खुपच हॉट आणि सुंदर; पहा फोटो
संजय दत्तच्या गर्लफ्रेंडला किस केल्यामुळे धर्मेंद्रने खाल्ला होता संजू बाबाचा मार