रियाने इतका महागडा वकील कसा हायर केला, स्पॉन्सर कोण?; ‘या’ दिग्दर्शकाचा सवाल

नवी दिल्ली | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत जनतेपासून ते अनेक बॉलीवूड सिनेकलाकारांनी न्याय मिळन्यासाठी सीबीआय तपासाची मागणी केली होती. यामध्ये दिग्दर्शक शेखर सुमनचे नाव सुद्धा आहे. शेखर सुमनने सुशांतच्या मृत्यूनंतर अगदी बिनधास्तपणे सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसल्याचे पहिल्या दिवसापासून म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेखर सुमन यांनी  रिया चक्रवर्तीवर प्रश्न उपस्थित केला. रियाने तर यूटर्नच घेतला. तीने केस लढण्यासाठी  भारतातील सर्वात महागडा वकील हायर केला आहे.तिला कोण स्पॉन्सर करत आहे, असा सवाल शेखर सुमनने उपस्थित केला आहे.

जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्या जाण्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत थोडातरी वेळ घालवता, पण रियाने तर युटर्नच घेतला असल्याचं शेखर म्हणाला आहे.

शेखरने सुशांतच्या मृत्यूशी संबंधित अन्य बाबींवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. सीबीआय आपले काम सक्षमपणे करेल. खरे चित्र समोर येईल. मी कुणाकडे बोट दाखवत नाही, असंही शेखर म्हणाला आहे.

शंकेची सूई स्वाभाविकपणे अनेक लोकांकडे जात आहे. कारण प्रत्येकाचा जबाब वेगवेगळा आहे. सिद्धार्थ पिठानीपासून अ‍ॅम्ब्यूलन्स वाला, प्रत्येकजण वेगवेगळे बोलत आहे. त्यांचे जबाब एकमेकांशी मॅच होत नाहीत. असे वाटते त्यांना कॅरेक्टर दिले गेले होते, पण ते अ‍ॅक्टर नाहीत त्यामुळे योग्य प्रकारे रोल करू शकले नाहीत, असा शब्दप्रयोग करत शेखरने अनेकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात रियाचा वार्षिक इन्कम 14 लाख रूपये आहे. यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की,  तिने इतका महागडा वकील कसा काय हायर केला?, तिला कोण स्पॉन्सर करत आहे?, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.