शेतकरी कामगार पक्ष मुळशी तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी

पिरंगुट : मुळशी तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पिरंगुट घोटावडे फाटा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान मध्यवर्ती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आजपर्यंत अनेक राजे होऊन गेले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांना अखंड भारत प्रामुख्याने ओळखतो कारण हा एकमेव राजा ज्याचे राज्य हे रयतेसाठी होते.”

या निमित्ताने मुळशी तालुका शेकाप कार्यकारणीची पदे वाटप करण्यात आली. शेतकरी सभा तालुका अध्यक्ष पदी अजय पवळे, कामगार सभा तालुका अध्यक्ष पदी गणेश मांडेकर, तालुका कार्यालयीन चिटनीस पदी राजू पवळे, सहचिटणीस पदी दत्ता लायगुडे, कोषाध्यक्ष पदी हनुमंत केदारी व सदस्य पदी अतुल पवार, राजेश गोळे, अतुल कुंभार यांची नियुक्त करण्यात आली.

तसेच यावेळी बोलताना तालुका चिटणीस मोहन गोळेपाटील म्हणाले, “रयतेचे राज्य यावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हाती सत्ता दिली आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात केली.”

दरम्यान, यावेळी बडे सर, शंकर सुतार सदस्य कासार आंबोली ग्रामपंचायत, संदीप पाटील, प्रणव उभे, सुनिल साळवे, ज्ञानेश्वर कदम, दिनेश केदारी, जावेद मुलाणी, विजय पाटील, अबा सुतार, महेंद्र पवळे हे प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी भाऊ केदारी राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग अध्यक्ष, गणेश मांडेकर यांनी आपले मत व्यक्त केले. सुत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले व अभार हनुमंत केदारी यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.