“रोई ना जे याद मेरी आई” शहनाजच्या त्या गाण्यामुळे प्रेक्षक झाले भावूक…सिद्धार्थच्या आठवणी झाल्या पुन्हा ताज्या

सिद्धार्थचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ३ सप्टेंबर रोजी ओशिवरा स्मशानभूमीत सिद्धार्थवर अंत्यसंकार करण्यात आले होते. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा संपूर्ण डोंगर कोसळला.

सिद्धार्थच्या जाण्यानंतर ते स्वतःला सावरत आहे. त्याच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला.पण त्याच्या जवळच्या मैत्रिणी शहनाज गिलची अवस्था दयनीय झाली होती. सिद्धार्थच्या अंत्यसंस्काराच्या वेळचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते यावेळी ती स्वतः ला सावरू शकत नव्हती अशी अवस्था झाली होती.

पण आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती एक भावनिक गाणे गाताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर शहनाजचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तीच्या जुन्या लाईव्हचा आहे.

व्हिडिओमध्ये शहनाज ‘रोई ना जे याद मेरी आई वे’ हे भावनिक गाणे गात आहे. या पंजाबी गाण्याचे बोल तिच्या तोंडून ऐकून लोक खूप भावूक होत आहेत. कारण कोणाला माहित होते की या गाण्याच्या ओळी तिच्या जीवनाच्या खऱ्या बनतील. हे गाणे मूळ अल्बम शिद्दत अल्बमचे आहे, जे प्रसिद्ध गायक निंजा यांनी गायले आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली. सिद्धार्थ त्यांच्यामध्ये नव्हता या बातमीवर कोणीही विश्वास ठेवू शकले नाही. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारातून शहनाजचे फोटो व्हायरल झाले तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते.

सिद्धार्थ शुक्ला याला जाऊन बराच वेळ झाला आहे. पण प्रत्येकजण शहनाजबद्दल चिंतित आहे. ती सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर झाली आहे. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारांपासून ती अजून माध्यमांसमोर दिसली नाही आहे. प्रत्येकजण ती पुन्हा कधी कमबॅक करेल याची वाट बघत आहे.

 

महत्वाच्या बातम्या
साडी घातली म्हणून महिलेला हाॅटेलबाहेर काढले; दिल्लीतील संतापजनक प्रकार
बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला ढसाढसा रडली; समोर आले हैराण करणारे कारण
ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजप युती ? केंद्रीय मंत्र्याने सांगितला तडजोडीचा फाॅर्म्युला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.