Shefali Jariwala : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचे वयाच्या ४२व्या वर्षी अचानक निधन झालं. प्राथमिक माहितीप्रमाणे, तिचा मृत्यू कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) मुळे झाला. मुंबई (Mumbai) येथील अंधेरी (Andheri) भागातील तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत (found dead) आढळली आणि तातडीने कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) नेण्यात आली, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
शेफालीचा मृत्यू, पती फिरवत होता कुत्रा
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, शेफालीच्या पती पराग त्यागी (Parag Tyagi) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video on social media) व्हायरल झाला आहे, ज्यात तो बिल्डिंगच्या आवारात पाळीव कुत्रा फिरवताना दिसतोय. तोही त्याच वेळी, जेव्हा तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये होता आणि पोलिस घरात तपास करत होते.
शेफालीच्या मृत्यूपूर्वी पराग होता ‘जिममध्ये’
मृत्यूपूर्व काही तासांपूर्वी पराग त्यागी (Parag Tyagi) यांनी जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे अनेकांना संशय वाटतोय की, पत्नीच्या तब्येतीबाबत काहीच कल्पना नसताना पराग इतका रिलॅक्स कसा होता?
View this post on Instagram
सोशल मीडियावर संताप
नेटकऱ्यांनी या सगळ्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. “पत्नीचा मृत्यू होतो आणि हा माणूस घराबाहेर कुत्रा फिरवत असतो? त्याच्या चेहऱ्यावर कुठलंही दु:ख दिसत नाही,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटल्या आहेत. काही जणांनी याला “संवेदनाहीन वागणूक” असंही म्हटलंय.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक युनिट (Forensic Unit) देखील घटनास्थळी पोहोचली. शेफालीच्या घरातील नोकरवर्गाचीही चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, शेफालीच्या आईचा एका व्हिडिओमध्ये दु:खी अवस्थेत रडताना दिसणारा क्षण देखील लोकांच्या भावना हेलावून गेला.