ते शब्द खरे ठरले! ..तेव्हा मी आत्मह.त्येचा विचार केला होता; शीतल आमटेंचे ते विधान चर्चेत

मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

तसेच यानंतर डॉ. शीतल आमटे यांनी जुलै २०१९ मध्ये थिंक बँकला दिलेल्या मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्या  म्हणतात, ‘श्रीलंकेत असताना आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, असा खुलासा केला होता. पेशाने डॉक्टर असलेल्या शीतल आमटे यांनी आपलं मेडिकल शिक्षण घेणं थोडसं चुकलं असल्याचेही म्हटले होते.

‘मला बनायचं आर्टिस्ट होतं. पण बाबांची इच्छेमुळे मी डॉक्टर बनले. माझ्या वडिलांच्या सोबत काम केलं तर कदाचित आयुष्याला ध्येय मिळेल. पर्पज ऑफ लाईफ हे माझ्यासाठी थोडंस काहीतरी आहे जे मला आहे त्यासाठी मी जगते. पर्पज शोधण्यासाठी मी आनंदवनात रुजू झाले,’ असे त्यांनी म्हंटले होते.

याचबरोबर माझे पती गौतम देखील मी आनंदवनात काम करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर श्रीलंकेला गेलो. सेव्हन स्टार रिसॉर्ट होते. तिथं सर्व सुखसोयी एका छताखाली होत्या. मात्र मला अस्वस्थ वाटायला लागलं आणि काही दिवसांनी आत्महत्येचे विचार यायला लागले, अशा भावना डॉ. शीतल आमटे यांनी व्यक्त केल्या होत्या.

आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट…
आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास शीतल आमटे-करजगी यांनी एक ट्विट केले होते. वॉर अँड पीस या शीर्षकासह शीतल यांनी एका ऍक्रेलिक पेटिंगचा फोटो ट्विट केला होता. या ऍक्रेलिक पेटिंगच्या खाली स्वत:चं नाव आणि कालची तारीख आहे. दरम्यान, शीतल यांच्या निधनाची बातमी येताच त्यांचे शेवटचे ट्विट चर्चेत आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘ही’ कंपनी म्हणतेय आमची लस आहे कोरोनावर १००% प्रभावी; पहा कोणती आहे ती कंपनी
‘हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार’
कोरोनावरील लस कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.