डॉ. शीतल आमटे आत्मह.त्या प्रकरणात धक्कादायक माहिती; कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्मह.त्या?

मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आज आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यू नंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतं आहे.

अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. डॉ. शीतल यांनी घरच्या पाळीव कुत्र्यासाठी इंजेक्शन मागवण्यात आले होते. त्यातील एक इंजेक्शन त्यांच्या मृतदेहाबाजूला तुटलेल्या अवस्थेत सापडलं असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्यांसाठीचे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरच्या फार्मसिस्टच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली.

काही दिवसापूर्वी केले फेसबुक लाईव्हमुळे चर्चेत…

काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते.

या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केले. या व्हिडिओचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया…

शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमच्यासाठी हे सगळं अत्यंत धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व जण शॉकमध्ये आहोत,’ असे त्यांनी म्हंटले.

याचबरोबर ‘याची कल्पना आम्ही काहीच केली नाही. आम्ही सध्या पूर्णपणे शॉकमध्ये आहोत. प्रतिक्रिया देण्यालायक काही राहिलंच नाही. आम्ही हादरून गेलो आहोत.’ अशा शब्दांत दिगंत आमटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
लसीचा डोस घेतल्यानंतरही करोना का झाला? भारत बायोटेकने सांगितलं कारण…
वाह अजितदादा वाह! ती शपथ विसरलात?, भाजपचा सवाल
‘मुख्यमंत्रीसुद्धा शरद पवारांचं मार्गदर्शन घेतात, कॉंग्रेसने देखील स्वीकारायला हवं’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.