Share

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा, गुवाहाटीत ‘या’ ठिकाणी दिसली शीना बोरा

शीना बोरा हत्या प्रकरण सगळ्यांनाच परिचित आहे. भारतात नावाजलेले हे प्रकरण सर्वांच्या लक्षात राहीलच असेच होते. शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला पुन्हा एकदा नविन वळण आले आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. ५ जानेवारी म्हणजेच दोन दिवसांपुर्वीच शीना बोरा, गुवाहाटी येथे दिसल्याचा दावा केला जात आहे. आता हा दावा कितपत खरा आहे यावर चर्चा होतांना दिसत आहे.

सविना बेदी ही महिला मुखर्जी परिवाराच्या निकटवर्ती असल्याचे संगितले जात आहे. या महिलेने संध्याकाळी सहाच्या सुमारास शीना बोरा दिसल्याचा दावा केला आहे. सविना या INX मिडियाच्या माजी वकिल होत्या. त्यांनी कथीत शीना बोराचा व्हिडिओसुद्धा काढला आहे. शीना बोराला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण ती गायब झाली असे त्यांनी सांगितले आहे. सविना बेदी यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्रासह कोर्टात अर्ज केला आहे. या अर्जाच्या जोरावर या प्रकरणाचा तपास सुरु करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

या आधी देखील इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी शीना बोरा जिवंत असल्याचा कोर्टात दावा केला होता. त्या वेळेसही या बातमीने खळबळ उडाली होती. २४ एप्रिल २०१२ नंतरही शीना बोरा आणि राहूल मुखर्जी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आढळले आहेत. तसेच २४ एप्रिल नंतरही श्यामवर रॉय आणी राहुल हेही एकमेकांच्या संपर्कात होते. असा दावा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यानी केला आहे.

ते एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे शीना कुठे आहे हे राहुलाच माहित असेल. तसेच ४ एप्रिल २०१२ नंतरही ऑक्टोबर २०१२ ला ते संपर्कात असल्याचा पुरावा आहे. शीना बोरा सोबत राहुलने विवाहाचे बनावट प्रमानपत्र केले होते हे कोर्टात उघड झाले होते. अनेक पुरावे समोर असतांना देखील राहुल टाळाटाळ करत आहे. त्याला आठवत नाही, असे तो खोटे सांगत असल्याचे इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे करत आहे.

देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट आला आहे. शीना बोरा जिवंत असल्याचा दावा दुसऱ्यांदा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला नवा ट्वीस्ट आला आहे. सुरवातीपासुनच हे प्रकरण मुळातच गुंतागुंतीचे होते. त्यात असे दावे केले जात आहेत.

आता कोर्टात केल्या गेलेल्या दाव्यानुसार कोणती कारवाई होते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. जसे जसे वर्ष पुढे जात आहे तसे तसे या प्रकरणाचा गुंता अजुनच वाढत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील कारवाईची सुनावणी केली जाईल.

महत्वाच्या बातम्या
Indrani Mukherjee : दहा वर्षांनंतर इंद्राणी मुखर्जीची कोर्टात कबुली; केला ‘हा’ मोठा खुलासा
BJP : भाजपच्या मिशन बारामतीला मित्रपक्षानेच लावला सुरूंग, केली ‘ही’ मोठी घोषणा
रितेशच्या वेड चित्रपटातून ‘या’ बालकलाकाराने लावलंय प्रेक्षकांना वेड; तिची आई सुद्धा आहे प्रसिद्ध…

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now