केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitaraman) यांनी मंगळवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शेअर बाजारातही या अर्थसंकल्पाचे पडसाद उमटले. शेअर बाजारात अर्थसंकल्पादरम्यान व्ही शेप रिकव्हरी पाहायला मिळाली. पण शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunvala) यांनी काही वेळातच कोट्यवधी रुपये कमावले आहेत.(shear market big bull rakesh jhunjhunvala earned 342 corers from titan)
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांत टायटनच्या(Titan) शेअर्समध्ये सुमारे ३४२ कोटी रुपये कमावले आहेत. २०२२ च्या अर्थसंकल्पात कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या घोषणेनंतर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच तासात मोठी उसळी पाहायला मिळाली.
जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायात टायटन कंपनीचे मोठे नाव आहे. अर्थसंकल्प २०२२ च्या कस्टम ड्युटी कमी करण्याच्या प्रस्तावामुळे कंपनीचा व्यवसाय मजबूत होईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १ फेब्रुवारी रोजी, दुपारी १. १५ च्या सुमारास, टायटन कंपनीच्या समभागांनी २,३८५ रुपये ही दिवसाच्या व्यवहारातील नीचांकी पातळी गाठली.
यानंतर अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स २,४३६ रुपयांवर बंद झाले. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही तासांत कंपनीचे शेअर्स ७५.७५ रुपयांनी वधारले. टायटनच्या शेअर्सच्या वाढीमुळे राकेश झुनझुनवाला यांनी अंदाजे ३४२ कोटी रुपये कमावले आहेत.
टायटन कंपनीच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ३,५७,१०,३९५ शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या ४.२ टक्के आहे. राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये ९५,४५,५७५ शेअर्स आहेत.
रेखा झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीमध्ये १.०७ टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीचा टायटन कंपनीत एकूण हिस्सा ५.०९ टक्के आहे. अल्पावधीत टायटन कंपनीचे शेअर्स २,५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी २,८२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :-
जेव्हा रात्रीच्या ३ वाजता कपिल अचानक पोहोचला होता शाहरूखच्या घरी, अशी होती शाहरूखची रिऍक्शन
”गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला, आता दोन दिवस बस पोलीस कोठडीत”
नितेश राणेंचा कोठडीतील ‘तो’ फोटो तूफान व्हायरल, जाणून घ्या फोटोमागच खरं सत्य






