…आणि तिनेच मला चपलीने मारले, त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा अजब खुलासा

बंगळूरू | बंगळूरूमध्ये दोन दिवसांपुर्वी हितेशा चंद्राणी या तरूणीने जेवण मागविले होते. पण डिलिव्हरी बॉयने जेवण उशीरा आणल्याने हितेशा आणि डिलिव्हरी बॉय कामराजन यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने हितेशा यांच्या नाकावर बूक्का मारला होता.

घटनेनंतर हितेशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत डिलिव्हरी बॉयला अटक केली होती. पोलिस तपासात कामराजनने त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

हितेशा यांची ऑर्डर घेऊन मी त्यांना देण्यासाठी निघालो होतो. रस्त्यात ट्राफिक जाम झालं होतं त्यामूळे मला त्यांच्या घरी पोहचण्यास उशीर झाला. त्याबद्दल मी त्यांची माफी मागितली होती. मात्र तरीही हितेशा यांनी मला शिवीगाळ केली आणि ऑर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतली. मी त्यांना ऑर्डरचे पैसे मागितले असता त्यांनी मोठमोठ्याने गोंधळ घालत पैसे देणार नाही असं सांगितलं.

हितेशाने त्यानंतर मला चपलेने मारहाण करण्यास सूरूवात केली. मारहाण करताना मी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिचाच हात तिच्या नाकावर लागला आणि बोटातील अंगठी नाकावर लागून रक्त येऊ लागले.

हितेशा यांच्या फ्लॅटवर मी गेल्यावर मला कस्टमर सपोर्टरने हितेशा यांनी ऑर्डर कॅन्सल केल्याचं सांगितलं. मी हितेशा यांना ऑर्डर परत मागितली असता त्यांनी माघारी देण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनीच माझ्यासोबत हे कृत्य केले आहे आणि मी मारहाण केल्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला आहे.

दरम्यान या प्रकारानंतर झोमॅटो कंपनीने तरूणीची माफी मागितली होती. तसेच डिलिव्हरी बॉयवर कठोर कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं. यानंतर डिलिव्हरी बॉयने पोलिसांना ही माहिती दिली असल्याने या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे पाहणं तितकचं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा रतन टाटा पडले होते प्रेमात पण, चीनमुळे झाला होता त्यांचा ब्रेकअप; वाचा नक्की काय झालं होतं
शेतकऱ्यांच्या सुखासाठी वाढदिवसाला फळांचा केक कापा, सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर
एटीएम फोडायला गेलेल्या चोराला एटीएममध्येचं टाकलं कोंडून; वसईच्या रणरागिनीचा पराक्रम
मॉडेलच्या नाकावर बुक्का मारणाऱ्या डिलीव्हरी बॉयने पोलिसांना सांगितली भलतीच कहाणी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.