‘ती’ पोस्ट आली अंगलट; अभिनेत्री केतकी चितळेला होणार अटक ?

मुंबई। अनेक कलाकार हे अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अशीच छोट्या पडद्यावरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ तसेच ‘आंबट गोड’ या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री केतकी चितळे बऱ्याचदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.

त्यामुळे सध्या ती ड्रामेबाज म्हणून ओळखली जाते. ती अनेकदा प्रचंड ट्रोलही होत असते. तर यावेळी ती केवळ वादग्रस्त विधानांत अडकली नाही तर तिच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. केतकीने केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

केतकी चितळे हिने 1 मार्च 2020 रोजी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती. दरम्यान पोस्टनंतर आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तिच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबईतील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी ही तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. 1 मार्च 2020 रोजी केतकीने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.

यात तिने “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असे लिहिले होते.

व या पोस्टनंतर तिच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

केतकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ती कायम चर्चेत असते. मात्र आता तिची हीच वादग्रस्त विधानं तिच्या अंगलट आली असून आता तिला अटक होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही; नांगरे पाटलांचा लालबागमध्ये थेट इशारा 
अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने कर्णधारपदाचा दिला राजीनामा; धक्कादायक सत्य आलं समोर
माते तुला सलाम! जीव मुठीत घेऊन गर्भवती महिलेने थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय; गोंडस मुलाला दिला जन्म 
अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने कर्णधारपदाचा दिला राजीनामा; धक्कादायक सत्य आलं समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.