काय सांगता! एकाच वेळी दोघींना डेट करत होते बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा; बघा कोण होत्या ‘त्या’ दोघी

बॉलीवूडचे बिहारी बाबू शत्रुघ्न सिंन्हा ७० आणि ८० च्या दशकात त्यांच्या खास अंदाजासाठी खुप प्रसिद्ध होते. त्यांनी कालीचरण, काला पत्थर, विश्वनाथ, नसीब अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमूळे ते बॉलीवूडचे सुपरस्टार झाले.

चित्रपटांसोबतच शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील खुप जास्त चर्चेत असायचे. बिहारच्या या स्टारवर एक नाही तर दोन मुली फिदा होत्या. त्यांच्या लव्ह स्टोरीस खुप जास्त प्रसिद्ध होत्या. त्यावेळी अनेक ठिकाणी शत्रुघ्न सिन्हाच्या अफेअरच्या बातम्या छापून यायच्या.

शत्रुघ्न सिन्हावर रिना रॉय आणि सोनाक्षी सिन्हाची आई पुनम सिन्हा. या दोघींचेही शत्रुघ्न सिन्हावर खुप जास्त प्रेम होते. त्याकाळी या दिघांच्या अफेअरच्या चर्चा खुप जास्त होत्या. असे बोलले जात होते की, शत्रुघ्न सिन्हा एकाच वेळी दोघींना डेट करत आहेत.

या गोष्टीचा परिणाम त्यांच्या करिअरवर होत होता. रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हाने पहिल्यांदा १९७३ मध्ये रिलीज झालेल्या ‘मिलाप’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

चित्रपटांसोबतच खऱ्या आयुष्यात देखील या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. प्रत्येक चित्रपटासोबत या दोघांचे नाते अजून घट्ट होत गेले. दोघांनी एक दोन नाही तर एकूण १४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रेक्षकांना देखील या दोघांची जोडी खुप जास्त आवडत होती.

शत्रुघ्न सिन्हासोबत काम करण्यासाठी रिनाने अनेक मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता. रिनासाठी शत्रुघ्न तिचे आयुष्य बनले होते. त्यांच्यासाठी रिना फिल्मी करिअर देखील सोडायला तयार होती. रिनाला त्यांच्यासोबत लग्न करायचे होते.

पण रिनाचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. कारण शत्रुघ्न सिन्हाच्या आयुष्यात पुनमची एन्ट्री झाली. पटनावरून मुंबईला येताना या दोघांची ट्रेनमध्ये भेट झाली होती. शत्रुघ्न पुनमला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडले होते. या दोघांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली त्यावेळी शत्रुघ्न रिनासोबत रिलेशनशिपमध्ये होते.

त्यांनी एकाच वेळी दोघींना डेट करायला सुरुवात केली होती. म्हणून त्याकाळी या अफेअरचे खुप जास्त चर्चे होते. फिल्मी पडद्यावर त्यांची जोडी रिनासोबत हिट होती. तर खऱ्या आयुष्यात ते पुनमसोबत आनंदी होते. त्यांना पुनमसोबत राहायला खुप आवडायचे.

पण त्यांना जास्त काळ हे नाटकं करता आले नाही. त्यांना लग्नाचा निर्णय घ्यावा लागला. रिना रॉयमूळे शत्रुघ्न सिन्हाने त्यांचे लग्न एक वर्षे पुढे ढकलले होते. पण कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी शेवटी १९७९ मध्ये पुनमसोबत लग्न केले.

लग्नानंतरही शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉयचे अफेअर सुरू होते. ज्यावेळी पुनमला ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांना खुप जास्त राग आला. एवढेच नाही तर अनेकदा त्यांनी शत्रुघ्न आणि रिनाला एकत्र पकडले होते. शेवटी या गोष्टीला कंटाळून त्यांनी शत्रुघ्न यांना घटस्फोटाची धमकी दिली.

शत्रुघ्न सिन्हाचे त्यांच्या मुलांवर खुप जास्त प्रेम होते. म्हणून त्यांनी रिनाला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रिना रॉयसोबत ब्रेकअप केले. ह्या ब्रेकअपनंतर रिना खुप दुखी होत्या. म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली आणि त्या लंडनला गेल्या.

लंडनमध्ये त्यांची भेट पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत झाली. रिनाला त्यांची सोबत खुप जास्त आवडली. म्हणून त्यांनी मोहसीनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर त्या पाकिस्तानला गेल्या. पण त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.

रिना रॉय आज लाईमलाईटपासून दुर एकट्या आयुष्य जगत असतो. तर शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहत आहेत. त्यांची मुलगी सोनाक्षी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. असे बोलले जाते की, सोनाक्षीचा चेहरा रिना रॉयसोबत खुप जास्त मिळता जुळता आहे.

रेखाला पाहून शशी कपूर झाले होते शॉक; म्हणाले, ही काळी अभिनेत्री कशी बनणार?

करिअरसाठी रश्मीका मंदानाने सोडले होते प्रेमाला; मोडला साखरपुडा

सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

‘कुमकूम भाग्य’ फेम अभिनेत्री स्रीती झा आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या आलिशान घराचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.