शशांक केतकर बनला ‘बाप’माणूस; बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज…

मुंबई : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. शशांकने स्वत: सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्रामवर बाळाचा आणि त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत बाळाचा चेहरा दिसत नाही. पण शशांकच्या चेह-यावरचा आनंद मात्र स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना शंशाकने लिहिले आहे की, ऋग्वेद शशांक केतकर म्हणजे शंशाकला मुलगा झाला आहे. शशांकची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

याचबरोबर त्याने त्याच्या मुलाचं नावदेखील सांगितले आहे. शशांकने बाळाचे नामकरण ऋग्वेद असे ठेवले आहे. शशांकने गतवर्षी बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

दरम्यान, शशांक ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. तसेच सुखांच्या सरींनी हे मन बावरे, इथेच टाका तंबू, नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेत त्याने काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कंगनाने काँग्रेस आमदाराला सुनावले; ‘मी कंबर हलवत नाही सरळ हाडं तोडते’
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार; राखी सावंतचा शॉकिंग दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.