VIDEO:जिम सुरु होताच पुण्याच्या डॉक्टरबाई जिममध्ये दाखल, साडीवरच केला ‘झिंगाट’ वर्कआऊट

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातले होते, पण आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहे. पुण्यातही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

आता पुण्यात हॉटेल, दुकाने, जीम सर्वकाही सुरु झाले आहे. जीम सुरु झालेल्यामुळे एका फिट फ्रिके असलेल्या एका महिला डॉक्टरला खुप आनंद झाला आहे. त्यामुळे तिने चक्क साडीवरच वर्कआऊट केला आहे. तो पण झिंगाट गाण्यावर.

जीम सुरु झाल्याचा आनंद गगनात मावत नसणाऱ्या या महिला डॉक्टरचे नाव शर्वरी इनामदार असे आहे. शर्वरी या नियमितपणे वर्कआऊट करत असतात. पण कोरोना काळात सर्व जीम बंद असल्याने त्यांना जीममध्ये जाता येत नव्हते. त्यामुळे शर्वरी या घरीच वर्कआऊट करत होत्या.

आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जीम सुरु झाल्या आहे. याची गोष्टीची माहिती मिळताच त्या सर्वात आधी जीममध्ये गेल्या आहे. त्या जीममध्ये त्या झिंगाट गाण्यावर साडीवरच वर्कआऊट करताना दिसत आहे.

जीममध्य जाताना अनेक लोक खास कपडे घालतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित वर्कआऊट करता यावे म्हणून. पण डॉक्टर शर्वरी या थेट साडीवरच जीममध्ये पोहचल्या आहे आणि त्यांनी वर्कआऊट करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे शर्वरी यांनी साडीसोबतच नाकात नथ, गळ्यात हार, हातात बांगड्या, डोक्याला टीकली लावून हा वर्कआऊट केल आहे. सण आल्याप्रमाणे एखादी महिला ज्याप्रमाणे नटते आणि जसा उत्साह चेहऱ्यावर असतो, तसाच काहीसा उत्साह शर्वरी यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. साडी वर उठणं बसणे अवघड जाते पण शर्वरी यांनी त्यावर वर्कआऊट पण केला, त्यामुळे सगळीकडे त्यांचे कौतूक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

वडील घरी उशिरा येत असल्यामुळे रागवलेली मुलीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?, पहा व्हिडीओ
गंगा नदीत तरंगणाऱ्या पेटीतून येत होता विचित्र आवाज; पेटी उघडताच सर्वांना बसला धक्का
VIDEO’; काय सांगता! ही मांजर तर भविष्य सांगते, Euro 2020 सामन्यांबद्दल करतेय भविष्यवाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.