अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर पैसे थकवल्याचा आरोप

सध्या मराठी टेलिव्हिजनवर तणावाचे वातावरण आहे. कारण मालिकेचे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली आहे. मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. शर्मिष्ठाच्या या आरोपामूळे मराठी टेलिव्हिजनमध्ये खळबळ उडाली आहे.

शर्मिष्टा शेवटची कलर्स मराठीवरील ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत दिसली होती. या मालिकेला संपून महिने झाले आहेत. तरीही मालिकेच्या दिग्दर्शकाने पैसे दिले नसल्याचा आरोप शर्मिष्ठाने केला आहे. तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून या गोष्टीची माहीती दिली आहे.

शर्मिष्ठा म्हणाली की, ‘आम्ही कलाकार नेहमी आपल्याकडुन चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे’?

 

शर्मिष्ठाच्या या आरोपावर दिग्दर्शक मंदार देवस्थळीने फेसबूक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. मंदार देवस्थळीने सांगितले की, बिकट आर्थिक परीस्थिती असल्यामूळे पैसे दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पैसे देण्यासाठी कलाकारांकडे थोडा वेळ मागितला आहे.

मंदार देवस्थळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजपर्यंत वादळवाट, अवघाची संसार, वादळवाट, होणार सून मी ह्या घरची, फुलपाखरु, आभाळमाया अशा मालिकेंचे दिग्दर्शन केले आहे.

महत्वाचच्या बातम्या –

अभिनेत्री नेहा पेंडसेचा नवऱ्यासोबत किस करताना व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ

मधूबाला, कमाल अमरोही आणि मीना कुमारीचा लव्ह ट्रॅंगल ऐकून तुम्हाला धक्का बसेल

वडीलांच्या ‘त्या’ एका अटीमूळे आजही एकता कपूर आहे अविवाहीत

करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.