…म्हणून मुलाच्या लग्नात दुखी होत्या शर्मिला टागोर; स्वत: सांगितले कारण

प्रत्येक आई तिच्या मुलाच्या लग्नात खुप आनंदी असते. लग्नात काय तयारी केली पाहिजे. कोणी काय घातले पाहिजे. या सर्व गोष्टींकडे मुलाच्या आईचे बारकाईने लक्ष असते. पण फिल्म इंडस्ट्रीतील लग्नाचे काही वेगळेच वातावरण असते.

आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या त्यांच्या मुलाच्या लग्नात आनंदी, उत्साही नव्हत्या. त्यांनी स्वत या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, सैफ आणि करिनाचे लग्न झाले त्या दिवशी मी बिलकूल आनंदी नव्हते. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

करिना कपूर बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या कुटूंबातील मुलगी आहे. तर सैफ अली खान नवाब आहे. त्यामूळे दोघांच्या लग्नाच्या चर्चा तर होणारच ना. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. दोघेही एकत्र खुप आनंदी आहेत. एवढे वर्ष झाली तरी त्यांच्या भांडणाच्या बातम्या समोर आल्या नाहीत.

करिना आणि सैफ दोघेही एकत्र आनंदाने संसार करत आहेत. त्यांना दोन मुलं झाली आहेत. एका चित्रपटाच्या सेटवर झालेली दोघांची भेट लग्नापर्यंत जाऊन पोहोचली आणि आज ते एकमेकांसोबत खुप आनंदी आहेत. काहीही झाले तरी त्यांना वेगळे व्हायचे नाही.

२०१२ मध्ये सगळी फिल्म इंडस्ट्री सैफ आणि करिनाच्या लग्नासाठी उत्साही होती. पण सैफची आई शर्मिला टागोर मात्र या लग्नासाठी बिलकूल उत्साही नव्हत्या. त्यांनी स्वत या गोष्टीचा खुलासा केला आणि त्यासोबतच त्या उत्साही का नव्हते. याचे कारण देखील सांगितले.

शर्मिला टागोर यांनी सांगितले की, सैफच्या लग्नासाठी मी बिलकूल उत्साही नव्हते ही गोष्ट खरी आहे. लग्नात काय परिधान करणार या प्रश्नाचे उत्तरही माझ्याकडे नव्हते. हा क्षण सगळ्यांसाठी खुप आनंदाचा होता. पण मी आनंदी नव्हते. त्यामागे कारणही तसेच होते.

त्यांनी पुढे सांगितले की, सैफ आणि करिनाच्या लग्नासाठी मी उत्साही नव्हते. कारण माझ्या पतीचे निधन होऊन एक वर्षही पुर्ण झाले नव्हते. मला त्यांची कमी जाणवत होती. त्यामूळे मी लग्नात थोडी शांत होते. पण माझे सगळे कुटूंब या लग्नासाठी खुप उत्साही आणि आनंदी होते. करिना आणि सैफ एकत्र खुप छान दिसतात.

सप्टेंबर २०११ ला मन्सूर अली खानचे निधन झाले होते. तर ऑक्टोबर २०१२ ला सैफ आणि करिनाचे लग्न होते. दोघांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. त्यांचे लग्न जास्त काळ टिकणार असे देखील बोलले जात होते. पण त्या दोघांनी सगळीकडे दुलर्क्ष करुन आपल्या संसारावर लक्ष दिले.

महत्वाच्या बातम्या –
अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले
अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज, हॉटस्टार बरोबर पण केलाय सौदा पक्का
पतीला सोडून मी दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनमध्ये आहे पण…; अभिनेत्रीचा खुलेआम गौप्यस्फोट
‘या’ अभिनेत्रीने काहीच नसणाऱ्या अक्षयकुमारला रातोरात स्टार बनवले होते; पण पुढे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.