राजेश खन्नासोबत सर्वाधिक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोरने केले त्यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे; म्हणाल्या….

राजेश खन्ना यांना बॉलीवूडच्या पहील्या सुपरस्टारचा ताज मिळाला होता. त्यांच्या अगोदर देखील राज कपूर, देवानंद, दिलीप कुमारसारखे स्टार होते. पण राजेश खन्नासारखे स्टारडम दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला आजपर्यंत मिळाले नाही. त्यांनी त्यांनी अभिनयाने आणि लुक्सने प्रेक्षकांच्या मनात खुप वेगळी जागा निर्माण केली होती.

त्यांच्या स्टारडमला बघून तेव्हा उपर आका नीचे काका असे बोलले जाते. राजेश खन्नाने त्यांच्या हिट चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यामूळे त्यांच्याबद्दल अनेक किस्से प्रसिद्ध होते. राजेश खन्ना केलेली प्रत्येक गोष्ट स्टाईल बनायची.

असे बोलले जाते की, लाखो मुली त्यांच्यासाठी पागल झाल्या होत्या. म्हणून त्यांनी रक्ताने लिहीलेले पत्र यायची. तर अनेकदा त्यांची गाडी लिपस्टिकने लाल व्हायची. काही मुलींनी तर त्यांच्या फोटोसोबतच लग्न केले होते. अशा प्रकारे त्यांचे स्टारडम होते.

अभिनेत्री शर्मिला टागोरने त्यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. त्या राजेश खन्नाच्या खुप चांगल्या मैत्रीण होत्या. म्हणूनच त्यांनी राजेश खन्नाचे आयूष्य खुप जवळून पाहीले होते. एका पुस्तकामध्ये शर्मिला टागोरने राजेश खन्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल.

शर्मिला टागोरने सांगितले की, ‘एक काळ होता ज्यावेळी राजेश खन्ना त्यांचे चाहते, मित्र आणि नोकर यांच्यामध्ये राहायचे. पण त्यांच्या आयूष्यात एक काळ असा देखील आला. ज्यावेळी राजेश खन्ना एकटे पडले. त्यांच्यासोबत कोणीच नव्हते. त्यांनी चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी पाहील्या आहेत’.

शर्मिला टागोरने राजेश खन्नाच्या आयूष्यावर आधारीत ‘द डार्क स्टार: लोनलीनेस लाईफ ऑफ राजेश खन्ना’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली होती. शर्मिलाच्या मते राजेश खन्ना खुप चांगले होते. त्यांना सेटवर नेहमी आनंदी वातावरण आवडायचे. म्हणून ते स्वत देखील खुप आनंदी राहायचे.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘राजेश खन्ना मनाने खुप चांगले होते. कुटूंबासाठी आणि मित्रांसाठी ते काहीही करायला तयार होते. त्यांनी अनेकांना घर गिफ्ट केले होते. आपल्या माणसांची विचार करताना ते कधीच पैशांचा विचार करत नव्हते. म्हणूनच त्यांचे अनेक मित्र होते’.

राजेश खन्नाला आराधना चित्रपटानंतर खरे स्टारडम मिळाले होते. त्यामूळे त्यांच्या स्वभावात अनेक बदल झाले. ते थोडे गर्विष्ट झाले. सेटवर उशिरा येऊ लागले. म्हणून कलाकार त्यांच्यासोबत काम करणे टाळू लागले. मी देखील त्यांच्यासोबत काम करायला घाबरु लागले. हिच गोष्ट त्यांना नंतर त्रास देऊ लागली.

राजेश खन्ना स्टार होते. तेव्हा अनेक लोकं त्यांच्या पुढे मागे फिरायचे. पण जसे जसे त्यांचे स्टारडम संपले काका एकटे पडले. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. करिअर संपल्यानंतर तर राजेश खन्ना एवढे एकटे पडले की, त्यांना स्वत ची सगळी कामे स्वत करावी लागायची. असे अनेक धक्कादायक खुलासे त्या पुस्तकात करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?
‘सुर्यवंशम’ चित्रपटातील अभिनेत्रीचा शेवट होता अत्यंत वाईट; गरोदर असताना झाला मृत्यू
आईसाठी काय पण! स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बरने छातीवर गोंदवले आईचे नाव
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.