अभिनेता शर्मन जोशीची पत्नी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा चोप्रा ही शर्मन जोशीची पत्नी आहे. अभिनेता शर्मन जोशीने(Sharman Joshi) ‘३ इडियट्स’, ‘गोलमाल’, ‘धमाल’ यांसारख्या गाजलेल्या विनोदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.(sharman joshi wife this bollywood actor daughter news)
अभिनेता शर्मन जोशीने प्रेम विवाह केला आहे. त्याने वयाच्या २२ व्या वर्षी प्रेरणा चोप्रासोबत लग्न केले होते. अभिनेता शर्मन जोशी जन्म नागपुरमध्ये झाला. अभिनेता शर्मन जोशी गुजराती ब्राह्मण कुटुंबातील आहे. शर्मनचे वडील अरविंद जोशी हे एका प्रसिद्ध गुजराती नाट्यनिर्मिती संस्थेशी संबंधित होते. शर्मनची बहीण मानसी जोशी हिचे लग्न बॉलिवूड अभिनेता रोहित रायसोबत झाले आहे.
अभिनेता शर्मन जोशी आणि प्रेरणा चोप्रा यांना ३ मुले आहेत. एका मुलाखतीदरम्यान अभिनेता शर्मन जोशीने त्याची प्रेमकहाणी सांगितली आहे. अभिनेता शर्मन जोशीने सांगितले की, “प्रेरणासोबत पहिली भेट कॉलेजच्या दिवसांमध्ये झाली होती. दोघेही एकमेकांना आवडू लागलो. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.”
अभिनेता शर्मन जोशीने मुलाखतीत पुढे सांगितले की, “आम्हा दोघांनाही आपापल्या निवडीबद्दल खात्री होती. आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत हे आम्हाला माहीत होतं. आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नाही. आम्हाला माहित होते की आम्ही एकमेकांशी लग्न करण्यासाठीच बनलो आहोत. आई-वडिलांनी आमच्या लग्नाला विरोध केला नाही.”
“जेव्हा आमचे लग्न झाले, तेव्हा आम्ही फक्त २२ वर्षांचे होतो”, असे अभिनेता शर्मन जोशीने मुलाखतीत सांगितले. अभिनेता शर्मन जोशीच्या पत्नीने बॉलिवूडमध्ये काम करण्याऐवजी बिझनेस करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता शर्मन जोशीची पत्नी प्रेरणा चोप्रा आज एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये अभिनेता शर्मन जोशी आणि पत्नी प्रेरणा चोप्रा हजेरी लावतात.
महत्वाच्या बातम्या :-
सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देते शरमन जोशीची पत्नी, पहा फोटो
राजकीय नेत्याच्या प्रश्नाला चिमुकल्याने असे भन्नाट उत्तर दिले की राजकारण्याची बोलतीच झाली बंद; वाचा नेमकं काय घडलं….
मोठी बातमी! उत्तर प्रदेशातील मदरशांचे सरकारी अनुदान रद्द होणार, योगी सरकारने घेतला निर्णय