“..आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य”; शर्लिनचा साजिद खानवर आरोप

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्माने बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानने जियाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानंही साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यावर आपले मत व्यक्त करताना आपल्याला त्यांनी एडल्ट कंटेंट क्रिएटर बनवल्याचे सांगत बॉलीवूडलाही लक्ष्य केले.

साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर शर्लिन चोप्राने बॉलीवूड इंडस्ट्रीवरही आरोप केले आहेत. “हिरोइन बनायला आले होते. पण बनले एडल्ट कंटेंट क्रिएटर. त्याचे पूर्ण श्रेय मी बॉलीवूडला देते.” असे ट्विट शर्लिनने केले आहे.

शर्लिन म्हणते की, “माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी २००५ एप्रिलमध्ये साजिदला भेटायला गेले होते. त्यावेळेस त्याने त्याच्या पँटमधून स्वतःचा प्रायव्हेट पार्ट बाहेर काढला. मला स्पष्टपणे आठवते की, त्यावेळेस मी त्याला म्हणाले होती की, मला माहीत आहे, प्रायव्हेट पार्ट कसा असतो. मी त्याला भेटायला गेले होते, इतर गोष्टींसाठी नाही.”

तसेच या ट्विटसोबत तिने एक व्हिडीओही शेअर केला त्यात ती साजिद खानसंबंधी बोलताना दिसते. तिचे हे ट्विट आणि त्यासोबतचा व्हिडीओ चर्चेत आहे. तिच्या या आरोपांमुळे बॉलीवूडमध्ये #MeToo चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

“एडल्ट कंटेंट क्रिएटर आता बनले आहे. पण २००५ च्या आधीपासून एक महत्त्वाकांक्षी हिरोइन होते. कोणीही महिला कशीही असली तरी तिच्याशी असा अश्लील प्रकार होऊ नये.’ ती म्हणाली, ‘तुम्हाला जॉनी सिन्स बनायचे असेल तर जरूर बना, पण चित्रपटांमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणे ही कुठली संस्कृती आहे?” असा सवाल तिने केला आहे.

“कार्यक्रमाला बोलावता व अपमान करता, शोभत नाही तुम्हाला हे”; ममतांनी मोदींना तोंडावर सुनावले

बातमी कामाची! राज्यात नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती

लस घेण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी करावे लागणार लिंक; वाचा सरकारचे आदेश 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.