‘तो’ व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, ..आणि आपल्याला वाटतं फक्त भारतीयच जुगाडू असतात

दिल्ली | आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. ते नवनवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. कल्पनाशक्ती प्रत्यक्षात उतरवून प्रयोगशील व्यक्तींचे ते नेहमी कौतुक करत असतात.

काही लोकांच्या भन्नाट आयडिया आनंद महिंद्रा यांना खूप आवडतात म्हणून ते त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ भारतातला नसून विदेशी आहे.

या व्हिडिओत एक माणूस टेसला (Tesla) मोटर्सची एक गाडी चार्ज करत आहे. आता यात काही नवीन नाही. तुम्हाला tesla कंपनी माहीत नसेल तर सांगू इच्छितो tesla ही फक्त इलेक्ट्रिक गाड्या बनवणारी कंपनी आहे.

यात tesla कारचा मालक चक्क पेट्रोलवर चालणाऱ्या होंडाच्या (honda) जनरेटरने आपली गाडी चार्ज करत आहे. म्हणजे होंडाच्या पेट्रोलवर चालणाऱ्या जनरेटरने तो आपली tesla कार चार्ज करत आहे.

हा व्हिडीओ शेअर करतात आनंद महिंद्रा म्हणाले की, हे खूप हास्यास्पद आहे. आपल्याला वाटते की, फक्त भारतीय लोकच पूर्णपणे जुगाडू असतात. पण विदेशी लोक पण किती जुगाडू आहेत हे त्यांनी या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रानी याआधीही एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात एक माणूस आपल्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्या गाईचे दूध काढत होता. त्याने एक मशीन ट्रॅक्टरला जोडले होते ज्याद्वारे तो दूध काढत होता. आनंद महिंद्रानी त्याची खूप स्तुती केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.