मोठी बातमी! रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ, मुकेश अंबानी १०० अब्ज डॉलर्स क्लबच्या शर्यतीत

मुंबई । भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे आता ते १०० अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आले आहेत. तसेच मुकेश अंबानी यांची संपत्ती ३.७ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे.

रिलायन्सचे शेअर्स उच्चांकी २४७९. ८५ रुपयांवर पोहोचले आहेत. अनेक दिवसानंतर ही वाढ बघायला मिळाली आहे. अंबानी सध्या जगातील १२ व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. यावर्षी अंबानींनी त्यांच्या संपत्तीत १५.९ अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली.

यामुळे जगातील सर्वच मोठ्या उद्योजकांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या आहेत. असे असले तरी त्यांच्यापुढे देखील अजून मोठी नावे आहेत. आता कंपनीचे मूल्य १५.५ लाख कोटी रुपयांच्या जवळ आहे. ज्यामुळे भारतातील सर्वात मौल्यवान असलेली पहिली कंपनी आहे.

रिलायन्सच्या शेअरची किंमत अशीच वाढू शकते. कारण लार्ज-कॅप स्टॉकने एक वर्षाच्या एकत्रीकरणानंतर नवीन ब्रेकआउट दिला आहे. पुढील काळात देखील यामुळे अंबानी यांचा मोठा फायदा होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

अनेक मोठ्या कंपन्यांना कोरोना काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मोठा फटका बसला आहे. मात्र अंबानी यांनी परिस्थितीत मोठा नफा मिळवला आहे. अनेक ठिकाणी गुंतवणूक देखील वाढवली आहे.

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच, धमक्यांमुळे मोदी सरकारने दिली Z प्लस सुरक्षा

देव तरी त्याला कोण मारी! मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आली अन्…

‘माझ्या जीवाला धोका, रुपालीताई मला घेवून चला’; वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.