भारीच! टी नटराजननंतर लागला मराठमोळ्या शार्दूल ठाकुरचा नंबर; आनंद महिंद्रांनी दिली एसयूव्ही ‘थार’

 

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली, त्या खेळाडूंवर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा भलतेच खुश झाले होते. त्यानंतर त्यांनी त्या खेळाडूंना कार भेट देण्याचा शब्द दिला होता.

आता आनंद महिंद्रा यांनी तो शब्द पाळला आहे. भारतीय गोलंदाज टी नटराजन याच्या पाठोपाठ मराठमोळ्या शार्दूल ठाकुरलाही आनंद महिंद्रा यांनी एसयूव्ही थार ही नवी कोरी कार गिफ्ट केली आहे.

गाडी मिळाल्यानंतर शार्दूल ठाकुरने आनंद महिंद्रांचे आभार मानत एक ट्विट केले आहे. नवीन महिंद्रा थार आलीये… महिंद्राने खरंच खूप जबरदस्त गाडी बनवलीये, ही एसयूव्ही चालवायला पण खूप मजा येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आमच्या कामगिरीची  दखल घेतल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार आनंद महिंद्राजी, असे ट्विट शार्दूल ठाकूरने केले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गोलंदाज टी नटराजनने सुद्धा शानदार प्रदर्शन केल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी त्याला पण एक एसयूव्ही थार गिफ्ट केली आहे. त्यानेही आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहे.

भारतीय संघासाठी खेळणे हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे. मला चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी चांगले प्रदर्शन करू शकलो, आज महिंद्रा यांचे गिफ्ट स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझे कौतुक केले आहे, असे ट्विट नटराजनने केले आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.