एवढे पैसे असून काय उपयोग, वृद्धांला मदत न केल्याने लोक श्रद्धा कपूरवर भडकले; पहा व्हिडिओ…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या इंडस्ट्रीमध्ये केलेल्या कामामुळे खूप नाव कमावले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सत्य सांगत आपल्या मनातील भडास व्यक्त केली आहे. वास्तविक या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, श्रद्धा कपूरने एका वृद्ध व्यक्तीला मदत केली नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याच गोष्टीला घेऊन अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की श्रद्धा कपूर तिच्या मित्रांसोबत जुहूमध्ये दुपारचे जेवण करून परत जात आहे. या दरम्यान एक वयोवृद्ध माणूस तिला मदतीसाठी विचारतो पण ती तिच्या मैत्रिणींशी बोलण्यात इतकी व्यस्त असते की ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याला मदत करत नाही.

श्रद्धा कपूरची ही कृती सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवडली नाही आणि त्यांनी आपला राग दाखवायला सुरुवात केली. व्हिडिओवर टिप्पणी करताना एका वापरकर्त्याने लिहिले, ‘खूप मोठे लोक आहेत, गरीब व्यक्तीला मदत करू शकत नाही.’ तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सर्वात मोठा गरीब श्रद्धा कपूरच आहे.’

यापुढे एका वापरकर्त्याने लिहिले, ‘हिरो तो आहे जो गरीबांना मदत करतो.’ तर एका वापरकर्त्याने लिहिले, ‘इतके पैसे असण्याचा काय उपयोग, की गरीबांना पैसेही देऊ शकत ​​नाही. अशा प्रकारे सर्व वापरकर्त्यांनी टिप्पणी केली आहे.

कामाबद्दल बोलायचे झाले तर श्रद्धा कपूर शेवटच्या वेळी टायगर श्रॉफच्या विरूद्ध ‘बागी 3’ चित्रपटात दिसली होती. आता ती ‘नागिन’ आणि ‘स्त्री 2’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय, श्रद्धा कपूर पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत दिग्दर्शक लव रंजनच्या पुढील शीर्षक नसलेल्या चित्रपटात स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

महत्वाच्या बातम्या
माते तुला सलाम! जीव मुठीत घेऊन गर्भवती महिलेने थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय; गोंडस मुलाला दिला जन्म 
एकेकाळी ‘या’ व्यक्तीची तोंडभरून स्तुती करणारी ऐश्वर्या आज ‘त्या’ व्यक्तीचा चेहरा देखील पाहत नाही कारण… 
हवाई दल म्हणाले, धावपट्टीला दीड वर्ष लागतील; गडकरी म्हणाले, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो… 
धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव, सुनील गावसकरांनी सांगितले ‘ते’ कारण..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.