श्रद्धा कपूरने साजरा केला कुत्र्याचा वाढदिवस; लोकं म्हटली एकीकडे गरीब माणूस पटरीवर उपाशी झोपतोय आणि ही..

 

 

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. तिचा आता ‘चालबाज इन लंडन’ हा चित्रपट येणार असून ती पहिल्यांदाच डबल रोलमध्ये दिसून येणार आहे. असे असताना ती आता तिच्या पाळीव डॉगीमुळे चर्चेत आली आहे.

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम हँडलवरून तिच्या पाळीव डॉगीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिचा पाळीव कुत्रा शायलोसोबत वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी तर तिला ट्रोलसुद्धा केलं आहे.

श्रद्धा कपूर नेहमीच आपल्या डॉगीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. शायलो आता १० वर्षांचा झाला आहे. आता श्रद्धा कपूरने शायलोचा १० वा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच तिने त्याचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे

माझ्या बाबूला १० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मला विश्वास होत नाहीये, की तू १० वर्षांचा झाला आहे. तू माझ्यासाठी नेहमीच लहान बाबू शायलो राहशील, असे श्रद्धा कपूरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

श्रद्धा कपूरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून काही लोकांनी तिला ट्रोल सुद्धा केले आहे. सेलिब्रिटी येडे आहेत का?, एकीकडे गरीब माणूस पटरीवर उपाशी झोपतोय आणि दुसरीकडे कुत्र्याला काजू बदाम खायला दिले जात आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट करत लोकांनी श्रद्धा कपूरला ट्रोल केले आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.