Sharad Ponkshe : चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री विविध विषयांवर आपले मत मांडताना दिसत असतात. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा अनेक भाषणांमध्ये ते आपले विचार व्यक्त करत असतात. याच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे हे आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे विविध विषयांवर वक्तव्य करत असतात. ते अनेक ठिकाणी व्याख्यानही देत असतात. त्यांचा असाच एक व्याख्यानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात त्यांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नात्यावर भाष्य केले आहे.
या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात की, “एक चित्र बघत आपली पिढी मोठी झाली. ते चित्र असं आहे की एक लंगोट नेसलेला, दाढी वाढलेला व्यक्ती रुबाबात राजासारखा खडकावर बसला आहे. त्याच्या बाजूला छत्रपती उभे आहेत. जे छत्रपती आहेत. छत्रपती पदावर बसलेले आहेत.”
“राज्याभिषेक झालेला आहे. स्वराज्याची निर्मिती झालेली आहे. राजा म्हणून राज्याभिषेक संपूर्ण देशाने मान्य केलेला आहे आणि ते विनम्रपणे मान खाली घालून शांतपणे बाजूला उभे आहेत आणि तो एक दाढी वाढलेला संन्यासी खडकावर बसलेला आहे. त्याचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्या उभ्या असलेल्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.”
“दोघेही ग्रेट का? खरा राजा तो असतो ज्याला आपल्या देशातल्या, आपल्या भूमीतल्या संतांना कसा आदर द्यायचा ते कळतं,” असे शरद पोंक्षे या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत. या व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आलेल्या आहेत.
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे हे अभिनयाबरोबरच भरपूर ठिकाणी व्याख्यानही देत असतात. त्यांचे व्याख्यान अनेकदा गाजलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे फक्त काही महीन्यांसाठीच? फडणवीसच होणार पुढचे मुख्यमंत्री, बावनकुळेंच्या वक्तव्याने शिंदे टेंशनमध्ये
‘शिंदे गटातील 16 आमदार पुन्हा मूळ शिवसेनेत येणार’; एकनाथ शिंदेंचं टेंशन वाढलं
..अन् नाराज अजित पवार थेट कार्यक्रमातूनच बाहेर पडले; राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात हायहोल्टेज ड्रामा
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक