Share

“राजसाहेबांचं भाषण म्हणजे…”, अभिनेते शरद पोंक्षेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ

raj thackeray

गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. तर कालच्या भाषणात राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं जर 3 मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

तसेच काल झालेल्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला.

यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. अशातच जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होतं आहे. काल झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणावर शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब.”, अशी पोस्ट लिहीत शरद पोंक्षे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

https://www.facebook.com/sharad.ponkshe.9/posts/pfbid0Kx22hJRcMKkpvQJUSCPYrnpFGJX8GNhuGY6HhDfL2x7KkcB4BXkBBjVZXropLjRbl

दरम्यान, पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध मुद्द्यांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर भाष्य केलं होतं. शरद पोंक्षे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, ‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्यांक होतील तिथे तिथे काश्मीर फाईल्स तयार होईल हे लक्षात ठेवा.’

तसेच अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून पोंक्षे यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. तसेच ते राजकीय विषयांवर देखील अनेकदा भाष्य करतात. यामुळे पोंक्षे हे सतत चर्चेत असतात.

महत्त्वाच्या बातम्या
‘ ‘या’ तिघांचा गेम शरद पवारांनीच केला’; राज ठाकरे यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
‘अजित पवारांवर धाड पण सुप्रिया सुळेंवर नाही’; राज ठाकरेंच्या आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
“जाहिर सभा, उत्तर सभा आता वाट ‘पुरवणी’ सभेची; प्रश्न राष्ट्रवादीचे अन् उत्तर BJP च्या C टीमचे”
राज ठाकरेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘ज्या मुंब्य्रात अतिरेकी सापडलेत…’

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now