बिहार निवडणूक निकालावर शरद पवार म्हणतात…

मुंबई | ‘बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी खूप मेहनत घेतली. बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याचा अंदाज असला तरी तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी RJDचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केले आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘मी जी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान, नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते आणि दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेले पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते. यामुळे तेजस्वी यादव यांना जे यश मिळालं आहे ते खूप चांगलं आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल अशी मला आशा आहे.’

याबाबत ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा फटका बसेल असेलं असं बोललं जात होतं मात्र तसं होताना दिसत नाही असंही ते म्हणाले. भाजपला या निवडणुकीत चांगला फायदा झाला असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास १२३  तर महागठबंधन ११२ जागांवर आघाडीवर आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
राहुल गांधी पुन्हा ठरले अपयशी! सभा झालेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन पिछाडीवर
बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ ठरला! मुख्यमंत्री कोण होणार? भाजप नेता म्हणतोय..
बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ! मुख्यमंत्री पदाबाबत नेत्यांकडून मोठी वक्तव्ये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.