मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे समजते आहे.
काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचे शरद पवार यांचं मत आहे.
तसेच एकीकडे मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रम करू नये, असे आवाहन केले असताना संजय राठोड यांनीच शक्तिप्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर काल शरद पवार हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तेव्हा याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकूणच संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश…
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. पोहरादेवी परिसरात केवळ ५० जणांना जमण्याची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट
अंधश्रद्धेचा कळस! सापाने दंश केल्यानंतर मुलीला नेले बाबाकडे; उपचाराअभावी सोडले प्राण
पहा सैफ- करिनाच्या बाळाची पहिली झलक; सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल