शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात, ‘पंजाबला पुन्हा एकदा अस्थिर करण्याचे पातक केंद्र सरकारने करू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही. मात्र या घटनेमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने बसलेले शेतकरी आज संतप्त झाले आहे. केंद्र सरकारने आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावल्या नाहीत.  केंद्र सरकारने परिपक्वपणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘माझी अपेक्षा अशी आहे की, केंद्रानं अजूनही शहाणपणा दाखवून या घटकांशी बोलत असताना एकदम टोकाची भूमिका सोडावी आणि चर्चा करावी. रास्त मागण्यांवर गांभीर्याने भूमिका घेऊन तोडगा काढायला हवा, ‘अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदी सरकारला आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या
बलात्का.राची तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे भावूक, म्हणाले…
…तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती; संजय राऊतांनी केले मोठे विधान
…अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.