कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. राज्यात देखील आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर ‘कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या,’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे.

त्याकरता रक्तदान शिबीरांचे देखील आयोजन करण्याचे आवाहन देखील पवार यांनी केले आहे. पवार यांनी या संदर्भातील एक पत्र ट्वीट केले आहे. धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर या महामारीवर निश्चित मात करू, असेही शरद पवार यांनी यामध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, ‘राज्यातील परिस्थितीवर राज्यशासन, पोलीस व प्रशासकिय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा,’ असेही शरद पवार यांनी पत्रात म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेचे बॉस”

शाहिद कपूरच्या बायकोने बिकनी घालून केले सोशल मीडियावरचे वातावरण गरम; पहा फोटो

“आगे आगे देखो होता है क्या!”; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने दिला मुख्यमंत्र्यांना इशारा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.