Sharad Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपला वेगळा गट स्थापन केला. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही त्यांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्हं आम्ही मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही,” असे शरद पवार म्हणाले.
बारामती येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सल्ला दिला. यासोबतच शरद पवार यांनी देशात व राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवरही यावेळी भाष्य केले.
पुढे बोलताना, “श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते,” असे शरद पवार म्हणाले.
तसेच “आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत: मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे,” असेदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान देशात सुरु असलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेवरही त्यांनी भाष्य केले. या मोहिमेची राष्ट्रीय कमिटी आहे. त्याचा मी सदस्य आहे. त्यात या मोहिमेची चर्चा झाली. हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळयांची त्यांना साथ आहे, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
त्यांनी केंद्र सरकारला संसद चालवण्याची आस्था आहे, असे गेल्या काही वर्षात वाटत नाही. तसेच केंद्राकडून चर्चेचे मार्ग बंद केले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर संजय राठोड यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या संधीबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.
महत्वाच्या बातम्या
The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाल्याचे चमकले नशीब, ‘या’ वेब सिरीजमधून करणार पदार्पण
Amitabh Bachchan: …जेव्हा युजर्स बिग बींना म्हणाले, ‘तुम्ही समजता कोण स्वतःला? अमिताभ बच्चन असाल पण तुमच्या घरी’
Ratan Rajput: तो मला जबरदस्तीने जंगलात घेऊन जात होता आणि लोक बघत होते, अभिनेत्रीने सांगितला भयानक किस्सा
Sharad Koli : गद्दारांना गाडण्याची शपथ, ५ हजार शाखा असणाऱ्या शरद कोळींच्या प्रवेशाचा सेनेला फायदा होईल का?