शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”

मुंबई | शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास ७० दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. मास्टरब्लास्ट भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला.

याचदरम्यान सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असे शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, ‘इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असे शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.