८० वर्षांचा योद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये! बेजार बळीराजाच्या भेटीला थेट बांधावर

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर  शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

आता  शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार थेट बळीराजाच्या बांधावर निघाले आहेत. आज आणि उद्या शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पवार अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहे.

याचबरोबर तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. यामुळे, शेतकऱ्यांना शरद पवार यांच्या दौऱ्यातून काहीतरी हाती लागेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौऱ्यावर जाणार आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत.

तसेच ‘गेल्या ७५ वर्षांपासून शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बदललेली नाही. शासनाने फक्त कर्जमाफीच्या घोषणा केल्या. माञ प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांचं पुर्ण कर्जमाफ झालेले नाही, असे भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले आहे.

याबाब ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेमि केले आहेत माञ प्रत्यक्षात शेतकऱ्याला एकही रूपया मिळाला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी नमुद केले.

 

महत्त्वाच्या बातम्या
स्मार्टफोनच्या किंमतीत मिळत आहेत हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना; किंमत फक्त…
विराट कोहलीचा मराठमोळ्या लावणीवर ठेका; पहा भन्नाट व्हिडीओ
आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीने आणलीये भन्नाट ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.