मुंबई | शेतकरी आंदोलनाबाबतीत केंद्र सरकारने आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
गेले आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकरी दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोदी सरकारला सल्ला दिला आहे.
आज शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे.
यावेळी ते म्हणाले, आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्न पुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान त्यात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं आहे. यामुळे ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती.’
मात्र, दुर्दैवानं ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना संक्रमणामुळे वाढतोय आजारांचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
गुड न्यूज! ‘या’ कंपनीने केंद्राकडे मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी
हजारो कोटींची संपत्ती मागे सोडून गेले MDH मसाल्याचे मालक गुलाटी; एकून संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील