‘संकटावर एकजुटीने मात करू, धीर सोडायचा नाही सरकार तुमचंय’

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार थेट बळीराजाच्या बांधावर गेले आहेत. आज त्यांच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. या दौऱ्यादरम्यान पवार यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.

यावेळी त्यांनी लातूर जिल्हयातील राजेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की,’ या संकटावर तसेच आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत परंतु धीर सोडायचा नाही. यावर मात करु, सरकार तुमचं आहे असा विश्वास शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

‘राज्य सरकार या प्रसंगी मदत करणार आहेच. अशा संकटात केंद्र सरकारने मदत करण्याची पद्धत आहे. कारण कधी नव्हे एवढं मोठं आर्थिक संकट सध्या राज्य सरकारवर आहे. आपल्याला कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. ते कर्ज आपण काढतो आहोत,’ असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्र सरकारने या शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली तर ते कर्ज घ्यावं असे मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार असल्याचे शरद पवार यांनी येथे बोलताना शेतकऱ्यांना सांगितले.

 

महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? अखेर शरद पवारांनीच सांगितले कारण
टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
प्रतिक्षा संपली! कोरोना लसीचे १० कोटी डोस रशिया भारताला देणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.