मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? अखेर शरद पवारांनीच सांगितले कारण

मुंबई | देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. या दरम्यान विरोधक दौरे करत आहे. राज्यावर संकट आले असताना राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? असा सवाल विरोधकांनी उचलून धरला होता.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील तुळजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘कोरोना संकटात मुख्यमंञ्यांना एका ठिकाणी बसण्याची विनंती केली आणि आढावा घ्यायला सांगितला, इतर मंञी फिल्डवर होते, आमच्याशी चर्चा झाल्याप्रमाणेच मुख्यमंञी जबाबदारीने काम करत आहेत, असे पवार म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेण्याला पर्याय नाही. पिक विम्यासंदर्भात शिथिलता करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार असल्याचे शरद पवार यांनी येथे सांगितले आहे.

याचबरोबर ‘अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आले नाही असं संकट यंदा राज्यावर आले असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
प्रतिक्षा संपली! कोरोना लसीचे १० कोटी डोस रशिया भारताला देणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.