Share

“पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरबद्दलचा किस्सा

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार(Sharad Pawar) यांनी कॅन्सरबद्दलचा त्यांचा एक किस्सा सांगितला.(Sharad Pawar told a story about cancer)

२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तुमच्याकडे केवळ सहा महिने राहिले असल्याचे शरद पवारांना सांगितले होते. पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शरद पवार यांनी डॉक्टरांचा अंदाज खोटा ठरवला. यासंदर्भातील गोष्टी शरद पवार यांनी कार्यक्रमात सांगितल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भाषणात म्हणाले की, “२००४ साली मला कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी एक डॉक्टर माझ्यावर उपचार करत होते. तेव्हा मी त्या डॉक्टरला विचारलं, माझ्याकडे पाहून तुला काय वाटतं, मला काय झालं असेल? त्यावर तो डॉक्टर म्हणाला, खरं सांगू का? मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाहीत.”

“पण मी तुम्हाला सांगतो. तुमची काही कामं राहिली असतील तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय? मला समजलं नाही. यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे सहा महिन्याचं आयुष्य उरलं आहे. त्यावर मी त्याला सांगितलं पैज लाव…मी काही इतक्या लवकर जात नाही”, असे शरद पवार यांनी भाषणात सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाषणात पुढे म्हणाले की, मी हसत त्या डॉक्टरला सांगितले की अगदीच जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यावरच मी जाईन, त्यामुळे तू माझ्याबद्दल असं काही बोलू नकोस. त्यावेळी २००४ सालं होतं. आज २०२२ आहे. मी अजून जिवंत आहे. मी अजून जाग्यावर आहे”, असे शरद पवार यांनी भाषणात सांगितले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर मोठं विधान केलं होतं. “औरंगाबाद नामांतराचा निर्णय आमच्या किमान समान कार्यक्रमामधील नव्हता. याबाबत आमच्याशी कोणताही संवाद झाला नव्हता. हा निर्णय घेतल्यावर आम्हाला कळालं”, असे सदर पवार यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :-
राज्यपाल थेट पंतप्रधान मोदींवर भडकले; ‘माझा राजीनामा माझ्या खिशात, फक्त तुमच्या संकेतची वाट पाहतोय’
“सत्ता असो किंवा नसो मी ठाकरेंच्या हाताला दिलेला हात सोडणार नाही”
‘मोदींच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे’, राज्यपाल संतापले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now