अर्णब गोस्वामी अटक प्रकरणावरून शरद पवारांचा राज्यपालांना टोला, म्हणाले…

मुंबई | वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. उच्च न्यायालयानेही अर्णब गोस्वामी यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना आपल्या कुटूंबियांना भेटून द्यावे असे सांगितले.

यावरून शरद पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, राज्यपाल यांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगलं आहे पण ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्यात त्यांच्याबद्दल जर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटून द्यावं असं अनिल देशमुख यांना सांगितलं होतं पण अनिल देशमुख यांनी त्याला नकार दिला.

कोरोनाकाळात गेल्या ४ महिन्यापासून कोणत्याही कैद्याला त्यांच्या कुटूंबियांना भेटू दिले नाही त्यामुळे अर्णब गोस्वामी यांनाही त्यांच्या कुटुंबियांना भेटता येणार नाही. अर्णब गोस्वामी बरे आहेत त्यांना जर कुटुंबियांशी बोलायचे असेल तर ते फोनवरून वार्तालाभ करू शकतात असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

धनंजय मुंडे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; स्वतः ट्विट करून दिली माहिती                                                बिहार निवडणूक निकालावर शरद पवार म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.