राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा न देता न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती.(sharad pawar take big decision on navab malik )
या बैठकीत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण त्यांच्या खात्याचा पदभार राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात येणार आहे, अशी चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
या बैठकीत नवाब मलिक यांचा राजीनाम्याबाबत चर्चा झाली. तसेच या बैठकीत भाजप पक्षाने पेनड्राईव्ह प्रकरणात केलेल्या आरोपांना उत्तर देण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्या अनुषंगाने देखील या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबई कार्याध्यक्ष आहेत. पण आता त्यांच्या जागी नव्या कार्याध्यक्षाची निवड होणार आहे. याबाबत देखील बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामात दिरंगाई होऊ नये म्हणून त्यांच्या खात्याचा पदभार इतर कोणाला द्यावा का? याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण राष्ट्रवादी पक्षाने ती मागणी फेटाळून लावली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून ३ एकर जमीन खरेदी केल्याचा मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही’, अभिनेत्याने उडवली खिल्ली
संजय दत्त आणि परवेझ मुशर्रफ यांच्या भेटीवरून भारतीय चाहते संतापले; म्हणाले, ‘संजयला दाऊद…’
‘द काश्मीर फाइल्स’कडून राधे श्यामला धोबीपछाड, बॉक्स ऑफिसवर केली रेकॉर्डतोड कमाई






