Share

घरावर झालेल्या हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे पण…’

sharad pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच घराच्या दिशेने चपलांचे जोडे देखील फेकले आहेत.(sharad pawar statement on home attack)

या सर्व घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

आज झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “कोणत्याही आंदोलनात टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. कोणी चुकीचा रस्ता दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची तुमची, माझी, सर्वांची जबाबदारी आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की, ” गेल्या ५० वर्षात एसटीचे एकही अधिवेशन चुकलेलं नाही. गेल्या काही महिन्यापासून कारण नसताना एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व एसटी कर्मचाऱ्यांना चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. नेता चुकीचा असेल तर काय होतं. हे आज दिसलं”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. शरद पवार म्हणाले की, “माझ्या घरावर हल्ला झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेक सहकारी तातडीने इथे पाहोचले. यामधून तुम्ही दाखवून दिलं आहे की आपण सगळे एक आहोत”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

या सर्व घटनेवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केलं आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामागे नेमका कोण सूत्रधार आहे? त्याचा लवकरच शोध घेतला जाईल”, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now