हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांची कृषी कायदे मागे घेण्यावर पहिली प्रतिक्रिया

शरद पवार सध्या चंद्रपुर दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. यावेळी त्यांनी मोदींच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. ते म्हणाले की, कृषी कायदे मागे घेणे हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण आहे.

गेले वर्षभर शांततेच्या मार्गाने संघर्ष करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सलाम करतो, अभिनंदन करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे. कृषी कायद्यांशी संबंधित फार चर्चा चालू होती. काही बाबतीत बदल करावेत, गुंतवणूकीला वाव मिळावा, शेतकऱ्यांच्या पिकाला उत्तम किंमत मिळावी.

त्यांच्या मालाला जागतिक बाजारपेठ मिळावी. याचा विचार केंद्र सरकारमध्ये चालू होता. मी स्वता १० वर्षे देशाचा कृषीमंत्री होतो. माझ्यासमोरही सविस्तर चर्चा झाल्या. कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत चर्चा झाली. पण या संबंधीचे निर्णय मात्र मंत्रिमंडळात बसून व्हावेत या मताचा मी नव्हतो.

आपल्या राज्यघटनेत कृषी हा विषय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे राज्य सरकार, संसद सदस्य, कृषी संघटना यांना विश्वासात घेऊन आपण यासंबंधीचा विचार केला पाहिजे, हे आम्ही ठरवलं होतं. मी कृषी मंत्री असताना देशातील सगळ्या राज्यातील कृषी मंत्री तसंच संघटनांच्या बैठका घेतल्या आणि यासंदर्भात चर्चा केली होती.

त्यानंतर सरकार बदललं आणि मोदी सरकारने तीन कायदे एकदम सदनात आणले, त्याबाबत राज्ये, संसद सदस्य किंवा शेतकरी संघटना यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यांनी थेट हे कायदे संसदेत आणले आणि अशरक्ष काही तासांत हे कायदे मंजूर करण्यात आले. आम्ही त्यावेळी हट्ट केला की कृषी क्षेत्र हा देशाचा आत्मा आहे.

अन्न आणि भूकेची समस्या सोडवण्याचा हा मार्ग आहे. हा मार्ग ज्यांच्या हातात आहे त्या शेतकऱ्यांसोबत याची सखोल चर्चा झाली पाहिजे. हा राजकीय विषय नाही. त्यामुळे आपण एकत्र बसू आणि विचार करून निर्णय घेऊ असं आम्ही सांगितलं. पण सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे म्हणणे मान्य केले नाही. त्यामुळे सभात्याग करावा लागला.

गोंघळही झाला आणि त्यादरम्यान सभागृहात हे कायदे मंजूर करून टाकले. या कायद्यांमुळे शेती अर्थव्यवस्थेत काही समस्या निर्माण होतील, अशी शंका काही लोकांच्या मनात होती. त्यामुळे हे कायदे झाले, पण त्याला विरोध सुरू झाला. देशाच्या इतिहासात जवळपास एका वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले. त्यांनी ऊन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार केला नाही, असे शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
नवरा बायकोची भन्नाट आयडीया, एकमेकांचे कपडे वापरून केली ७७ हजारांची बचत
‘सुर्यवंशी’ चित्रपटावर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली, चांगल दाखवता येत नसेल तर..
टाटांच्या ‘या’ शेअरने मालामाल! एका वर्षामध्ये १२ हजारांचे झाले १ लाख रुपये; जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात..
व्हीव्हीएस लक्ष्मणला सोडावे लागणार हैदराबाद, कुटुंबावर होणार ‘हा’ मोठा परिणाम, कमाई होणार कमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.