विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, काळ जाईल तेव्हा बघू- शरद पवार

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारचे काही नेते ईडीच्या रडावर आलेले दिसत आहे. काही नेत्यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली तर काही नेत्यांची ईडी चौकशी करत आहे. त्यामुळे भाजप ईडीचा गैरवापर करत आहे, असे सत्ताधारी पक्षातील नेते म्हणत आहे.

अशातच या ईडी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे काळ येईल तेव्हा बघू, असा टोला शरद पवारांनी विरोधकांना लगावला आहे.

अनिल देशमुख यांची कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या ईडीच्या केसेस वाचल्या का कधी? एकनाथ खडसे, अनिल परब, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरु आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

विरोधकांना नमवण्यासाठी एक साधन म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. ठिक आहे काही हरकत नाही. काळ येतो आणि जातो. काळ येईल तेव्हा त्यात दुरुस्त्या होईल, अशा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिला आहे.

यापुर्वी इतर काही गोष्टींची चर्चा झाली. पण गेल्या काही वर्षात देशातील लोकांना नवीन यंत्रणा माहित झाली, त्याचं नाव म्हणजे ईडी. ही ईडी कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

तसेच काल शिवसेनेच्या भावना गवळी आल्या होत्या. त्यांच्या तीन शिक्षण संस्था आणि एक इंडस्ट्री आहे. या संस्थांचा व्यवहार २०-२५ कोटींच्या आत आहे. त्यांना ईडी त्रास देत आहे. आपल्याकडे खोलात जाऊन चौकशीचा अधिकार असलेल्या संस्था असताना ईडी तिथे जाऊन हस्तक्षेप करते, ही राज्याच्या अधिकारावर गदा आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सापाची शेपूट पाहून अंदाजा लावू नका; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
जिद्दीला सलाम! १६ वेळा फ्रॅक्चर, ८ वेळा शस्त्रक्रिया तरी युपीएससी पास करुन तरुणी झाली कलेक्टर
अधिकाऱ्यांनी अचानक दिली शाळेला भेट; पण विद्यार्थ्यांच्या उत्तरावर खुश होत दिले अनोखे बक्षीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.