Share

‘ब्राह्मणांना आरक्षण देता येणार नाही, त्यांनी आरक्षणाला विरोध करू नये’; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ब्राम्हण समाजाच्या संदर्भातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ब्राम्हण समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील या भेटीत चर्चा झाली. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.(sharad pawar statement on bramhan community)

ब्राम्हणांना सध्य स्थितीत आरक्षण मिळू शकत नाही. ब्राम्हणांनी देखील इतर समाजाचे आरक्षण काढून घ्यावे, अशी मागणी करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांना सांगितले आहे. ब्राम्हण समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटीसाठी वेळ मागितली होती.

या भेटीसंदर्भात माहिती देताना शरद पवार म्हणाले की, “ब्राम्हण समाजात एक अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या काही सहकाऱ्यांनी विधाने केली होती. त्याबाबत अस्वस्थता होती. या विधानानंतर आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. जाती धर्माविरोधात बोलू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फक्त धोरणांवर टीका केली जाईल”, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले की, “अलिकडच्या काळात ग्रामीण भागात राहणारा वर्ग नागरी भागात आला आहे. त्यामुळे नोकरीत अधिक संधी मिळायला हवी. ब्राम्हणांना आरक्षण असायला हवं, अशी ब्राम्हण संघटनांची भूमिका आहे. पण सध्याच्या स्थितीत ब्राम्हणांना आरक्षण मिळणं कठीण आहे”, असे शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांनी सर्व आरक्षण काढण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. ‘अनेक जाती मागासलेल्या अवस्थेत आहेत, त्यांना प्रगतीसाठी आरक्षण द्यावं लागेल”, असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

ब्राम्हण समाजासाठी महामंडळ असावे, अशी मागणी ब्राम्हण संघटनेच्या नेत्यांनी या भेटीदरम्यान केली. ‘परशुराम महामंडळ’ या नावाचा विचार देखील ब्राम्हण संघटनेने केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून लवकर निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात एक दीड महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
आधीच प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या मुंबईला आणखी एक जोरदार धक्का? तो निर्णय पश्चातापाचा?
लग्नपत्रिकेत तब्बल ३५० पेक्षा जास्त लोकांची नावं; इस्लामपूरच्या लग्नपत्रिकेची राज्यभरात चर्चा
मुंबईमुळे बंगळुरूची झाली चांदी, प्लेऑफमध्ये मिळाली जागा; दिल्लीचे स्वप्न तुटले

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now