शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल; ‘राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण….’

मुंबई | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत.

आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने जमलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित केले. ते म्हणाले, ‘तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत.’

‘राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी टीका शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ‘राज्यपालांनी मोर्चाला सामोरे जायला हवे होते. राजभवनात बसायला हवे होते. ते घटनात्मक पदावर आहेत. पण आता काय बोलणार, असे पवार म्हणाले.

तसेच केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे आणले. एका अधिवेशनात एकाच दिवसात तीन कायदे मांडले गेले आणि ते लगेच मंजूर करून घेण्यात आले. त्याला राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि इतरांनी विरोध केला. चर्चेची मागणी केली. पण कोणत्याही चर्चेशिवाय कायद्यांना मंजुरी देण्यात आली, असे पवार म्हणाले.

दरम्यान, ‘आंदोलक शेतकरी राज्यपालांना भेटून निवदेन देण्यासाठी राजभवनाकडे निघाले होते, मात्र त्यांना वाटेतच पोलिसांकडून अडवण्यात आले. शिवाय, राज्यपाल देखील राजभवानात उपस्थित नसल्याचे समोर आल्याने, आंदोलक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. अखेर, राज्यपालांना द्यायचे निवदेन शेतकरी नेत्यांना फाडून टाकले.

महत्त्वाच्या बातम्या
“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”
‘ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर …’
“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.